रेल्वे बोर्ड सदस्य (वित्त), सौ. रूपा श्रीनिवासन यांनी मुर्तीजापुर स्थानक आणि यार्ड ची तपासणी केली
मुर्तीजापुर: रेल्वे बोर्ड सदस्य (वित्त), सौ. रूपा श्रीनिवासन यांनी मुर्तीजापुर येथील नैरोगेज इंजिन शेड, नैरोगेज स्थानक आणि नैरोगेज रोलिंग स्टॉक देखभाल सुविधांची तपासणी केली.
रेल्वे बोर्ड सदस्य (वित्त), सौ. रूपा श्रीनिवासन यांनी मुर्तीजापुर येथील नैरोगेज रेल्वे सुविधांची तपासणी दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांशी विशेष संवाद साधला. त्यांनी उप स्टेशन मास्टर (Dy. SS), गार्ड, यांत्रिक (डिझेल) विभागातील कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यांच्या कामाची माहिती घेतली. तसेच त्यांनी मुर्तीजापुर-यवतमाळ-अचलपूर या शाकुंतला ट्रेनच्या नैरोगेज विभागात काम केलेल्या एका निवृत्त सहकाऱ्याशी (मेट-इंजिनियरिंग) देखील संवाद साधला. या निरीक्षणादरम्यान भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या