Ticker

6/recent/ticker-posts

16 डिसेंबर पासून अत्याधुनिक सुविधेसह सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार सुरू

16 डिसेंबर पासून अत्याधुनिक सुविधेसह सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणार सुरू


अकोला 
सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तसेच मतदार संघातील नागरिकांना व पाच जिल्ह्यांना चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन खासदार माजी केंद्रीय मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी केंद्र शासनाकडून पाठपुरावा करून अकोल्यात सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल भरघोस निधी उपलब्ध करून तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी उपलब्ध करून उभारणी केली. या हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी माजी खासदार संजय भाऊ धोत्रे सातत्याने प्रयत्नशील होते आणि त्यांच्या प्रयत्नाने ती बिल्डिंग उभी झाली असून यासाठी आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता त्या अनुषंगाने दिनांक 16 डिसेंबर मंगळवारपासून नवीन सहाव्या अत्याधुनिक सुविधा सह सुरू होत आहे या निमित्ताने अकोला वेदकीय महाविद्यालय अभ्यासगत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक पणे मेन हॉस्पिटल, तसेच सुपर स्पेशलिटी, हॉस्पिटल पहाणी केली यावेळी हॉस्पिटलच्या डीन मीनाक्षी गजभिये, डॉक्टर प्रियंका जाधव तसेच तज्ञ यांच्यासोबत यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली. 


यावेळी 20 बेड,ची अत्याधुनिक सुविधा युक्त पुरेसा स्टॉप, वार्ड जनरल, वार्ड मातृ शक्तीसाठी विशेष सुविधा उपलब्ध झाले आहे. न्यूरोलॉजी, यूरोलॉजी विभाग, न्यूरो सर्जरी, काडीओलाजी, निफारोप्लाजी, प्लास्टिक सर्जरी विभाग ची उभारणी करण्यात आली आहे या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर यांनी संपूर्ण विभागाची पाहणी केली. सातत्याने पाठपुरावा करून तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या स्वप्नाची पूर्तता होत असून त्यांच्या वतीने आज आमदार सावरकर यांनी नवीन नियुक्त डॉक्टरांचे स्टॉप चे अकोले करांच्यावतीने स्वागत करून मंगळवारपासून प्लास्टिक एन्जोप्लास्टी एन्जोप्लास्टी होत असल्याचा समाधान व्यक्त केला. मंगळवारपासून ही सुविधा उपलब्ध होणार असून लवकरच राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते सुसज्ज हॉस्पिटलचे लोकार्पण सोहळा होणार आहे ‌.
आज रुग्णांची तसेच प्रशासनाची चर्चा करून त्यांचे अडीअडचणी समजून अधिवेशनाच्या पूर्वी राज्य शासनाकडे करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आज वेगवेगळ्या भागात जाऊन आमदार सावरकर यांनी प्रशासनाच्या भावना जाणून घेतल्या. नागपूर अधिवेशनात शासनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने वाडी अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने आमदार सावरकर यांनी अधिकाऱ्याची चर्चा केली त्याचाच भाग म्हणून आज त्यांनी जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज मध्ये जाऊन पाहणी केली व आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अकोले अकोला अमरावती बुलढाणा, वाशिम हिंगोली या जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व खासदार अनुप धोत्रे यांच्या माध्यमातून तत्कालीन खासदार संजय भाऊ धोत्रे यांना अपेक्षित कार्य करण्याच्या दृष्टीने व त्यांच्या वतीने धन्यवाद देण्यासाठी आज आरोग्य सेवेतील अधिकारी डॉक्टर्स नर्स यांना अभिवादन केले तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील.
दोनशे बेड नवीन उपलब्ध होणार आहे यामध्ये दहा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार असून सहा कोटी रिकवरी रूम ऑपरेशन थिएटर ऑपरेशन 20 जणांचे होणार आहे ‌. रेडिओलॉजी पॅथॉलॉजी बुरोलॉजी सुविधा उपलब्ध होणार असून 76 पदे भरण्यात आली आहे तसेच चार वर्गातील सुद्धा भरण्यात आली असून प्रथमच या रुग्णालयात एन्जोप्लास्टी सुविधा सुरू होणार आहे. अशी आशा व्यक्त केली यावेळी त्यांच्यासोबत अभ्यासगत समितीचे सदस्य गिरीश जोशी, वसंत बाछूका अंबादास उमाळे विवेक भरणे., अक्षय जोशी, दिलीप मिश्रा, अमोल गीते, डॉक्टर किशोर मालोकार विजय अग्रवाल जयंत मसने, डॉक्टर शंकरराव वाकोडे डॉक्टर अभय जैन, एडवोकेट जय देवाशिष काकड , राजेश बेले, माधव मानकर आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या