Ticker

6/recent/ticker-posts

मळसूर उमरा चान्नी येथे वरली मटका, खुलेआम !अनेकांचे संसार उद्ध्वस्त : चोरीच्या घटनेत वाढ

मळसूर उमरा चान्नी येथे वरली मटका, खुलेआम !अनेकांचे संसार उद्ध्वस्त : चोरीच्या घटनेत वाढ 


प्रतिनिधी नासीर शेख 
पातूर : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसूर उमरा चान्नी आदी गावात गेल्या काही महिन्यापासून वरली मटका व जुगार अड्डा खुलेआम सुरू आहे. याकडे चान्नी पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. वरली मटका व जुगार अड्डा सुरू असल्याने गावातील शांतता भंग होत असून, दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत आहे. गावातील तरुण मंडळी वरली मटका, जुगार खेळण्याच्या आहारी गेले असून, या अवैध धंद्यांचा परिणाम विद्यार्थ्यावर सुद्धा होत आहे. वरली मटका जुगार खेळण्यासाठी पैसे देण्यास नकार देत असल्यामुळे पत्नी आई वडील यांना मारहाण होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले असून, अनेक संसार उद्धस्त होण्याच्या मार्गावर आहे.वरली मटका जुगार अड्डा गावात सुरू झाला तेव्हापासून शेतकऱ्यांचे कृषी मोटर पंप व शेतातील शेती अवजारे व इतर साहित्य चोरीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी मळसुर येथील शेकडो ग्रामस्थांनी वरली मटका जुगार अड्डा सुरू असल्याचे व्हिडिओ सह संबंधिताकडे तक्रार केली होती. वरली मटका व जुगार अड्डा सुरू असल्याचे लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाले होते. मात्र चान्नी पोलिसांनी सकाळी दिखावासाठी तात्पुरता कारवाई केली, आणि पुन्हा संध्याकाळपासून वरली मटका व जुगार अड्डा सुरू करण्यास हिरवी झेंडी दिल्याचे चित्र आहे.याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन वरली मटका जुगार अड्डे कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी ग्रामस्थ कडून होत आहे.



मळसुर उमरा चान्नी येथे लाखोंची उलाढाल 
मळसुर येथे गावाला लागून चान्नी मार्गावरील एका शेतातील झाडाखाली , तसेच पांगरा मार्गावरील विश्वमित्र नदीवरील पुलाखाली, उमरा येथे बसस्थानकावर एका दुकानात, तसेच चान्नी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर बँकेच्या समोर असे या ठिकाणी वरली मटका खुलेआम सुरू असून, लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.



सकाळी कारवाई : संध्याकाळी हिरवी झेंडी 
वरली मटका व जुगार अड्डा सुरू असल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले किंवा ग्रामस्थांच्या तक्रारीवर पोलिसांकडून सकाळी कारवाई केली जाते, आणि आरोपींची समजपत्रावर सुटका करून तेच आरोपी संध्याकाळी वरली अड्डा सुरू असल्याची दुकान थाटत असल्याचे चित्र आहे.



अवैध धंदे बंद करण्यास अपयश : अभय कोणाचे ?
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत मळसुर चान्नी उमरा या गावात वारली मटका व जुगार अड्डा आदी धंद्यांना ऊत आला आहे. या अवैध धंदे करणाऱ्या माफियांना अभ्य कोणाचे आहे.असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या