अकोला पूर्वमध्ये रेकॉर्ड ब्रेक विकासकामे करणाऱ्या आमदार "रणधीर सावरकर " यांचा विजय सुनिश्चित, असे प्रतिपादन आदिवासी नेते विजयसिंह सोळंके यांनी केले
चोहोटा येथील पदयात्रेत उसळला जनसागर संवाद करताना ते बोलत होते.
अकोला
भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ज्यांना विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाते असे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी अकोला पूर्व मतदार संघामध्ये केलेली रेकॉर्ड ब्रेक विकासकामे हीच त्यांच्या विजयाची गॅरंटी आहे. हाच विश्वास आह. आणि हा विजय प्रचंड मताधिक्याने व्हावा यासाठी आपन सर्वांना अधिक मेहनत घ्यावी लागेल असे आवाहन माजी सभापती तथा भाजपा नेते विजयसिंग सोळंके यांनी चोहोटा बाजार येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
आज शुक्रवार रोजी चोहोटा बाजार येथे रणधीर सावरकर यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत अकोलापूर्व मतदार संघातील ग्रामीण भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.भाजपा महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेत अकोला पूर्व मतदार संघातील जनसागर उसळला होता. या पदयात्रे दरम्यान आमदार रणधीर सावरकर यांच्या सोबत खासदार अनुप धोत्रे , देविदास म्हैसने , शिवाजीराव देशमुख, विजयसिंग सोळंके, शिवसेना शिन्दे गटाचे उपजिल्हाप्रमुख गोपाल म्हैसने, मधुकर पाटकर, यांच्या सह महायुतीचे नेते पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
चोहट्टा येथील रैली...
रणधीर भाऊ सावरकर यांनी कधीच जाती पातीच राजकारण केलं नाही. सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन आपल्या मतदार संघाच्या विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मोठया प्रमाणावर निधी सुद्धा उपलब्ध करून दिला. मनून सर्वदूर रणधीर सावरकर यांच्या विजयासाठी नागरिक पुढे येताना दिसत आहेत. आज रोजी मतदार राजा सुद्धा हुशार झाला आहे. मतदार राजा हा कुठल्याही भूलथापाना बळी पडणारा नाही. तो फक्त विकासाला डोळ्यासमोर ठेवुन मतदान करेल असे मत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख गोपाल म्हैसने यांनी व्यक्त केले आहे. रणधीर भाऊ यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचा विकास मोठ्या झपाट्याने झाला आहे. यात अधिक भर टाकण्यासाठी त्यांना तिसऱ्यांदा प्रचंड मतांनी निवडून दयावे असे आवहन युवा खासदार अनुप धोत्रे यांनी उपस्थित नागरिकांना केले.
सर्व जिवा भावाच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक स्वतःसाठी अतिशय महत्वाची करून घेतली आहे.त्यासाठी प्रत्येक जण खुप मेहनत घेत आहेत. गावा-गावामध्ये जनतेकडून मोठ्या प्रमानावर प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे. तुमच्या सर्वांचा माझ्यावर असलेला विश्वास सदैव सार्थकी ठरवत आलो आहे आणि पुढेही असाच राहुल अशी ग्वाही देत. पुढील काळात सुद्धा आपल्या मतदार संघाचा विकास हा अधिक झपाट्याने करण्याचा माणस आहे. करिता मला सर्वांनी पुन्हा एकदा मतरूपी आशीर्वाद दयावेत. आपण सर्वांच प्रेम, विश्वास हीच माझी ताकत असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या