Ticker

6/recent/ticker-posts

संघटीत रहाल तर सुरक्षीत राहाल - योगी आदित्यनाथ

संघटीत रहाल तर सुरक्षीत राहाल - योगी आदित्यनाथ 



प्रतिनिधी - नागोराव तायडे
मूर्तिजापूर - जेव्हा जेव्हा आम्ही विभाजित होतो, तेव्हा आमच्यावर हल्ले झाले. "जब बटे थे, तब कटे थे', म्हणून विभाजित राहू नका, संघटित रहाल तरच सुरक्षित रहाल, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते योगी आदित्यनाथ यांनी येथे जाहीर सभेला संबोधित करताना केले. जनतेला आपली ताकद दाखवून द्या. जेव्हा जेव्हा विभागल्या गेलो त्या त्या वेळी निर्दयतेने कापल्या गेलो हे लक्षात ठेवा असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.महाअनाडी गठबंधन योगी आदित्यनाथ म्हणाले की, विधानसभेच्या या निवडणुकीत एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील महायुती, तर दुसरीकडे महाआघाडीच्या रूपाने महाअनाडी गठबंधन समोरासमोर आहेत. महाअनाडी नावाच्या या आघाडीस देशाची, धर्माची किंवा राष्ट्रभावनेची कदर नाही. त्यांना सामाजिक मूल्ये आणि आदर्शांची चिंता नाही, अशी टीकाही त्यांनी केली. छत्रपती शिवरायांनी आग्र्यास जाऊन विदेशी आक्रमक औरंगजेबास आव्हान दिले, त्यांचा तो संघर्ष आठवा, असे आवाहन करून योगी आदित्यनाथ यांनी महाविकास आघाडीच्या लांगूलचालनी धोरणावर कडाडून टीका केली.


योगी आदित्यनाथ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. संभाजीराजांनी केलेल्या संघर्षापासून प्रेरणा घेवून देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला गेला. आता तोच संघर्ष आपल्याला लढायचा आहे, याची आठवण करून देण्यासाठी मी इथे आलो आहे, असे भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारसभेत बोलत होते. 
          मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ महायुती चे उमेदवार हरीष पिंपळे यांच्या प्रचारार्थ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (लाल शाळा) च्या प्रांगणात भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मंचावर अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनुप धोत्रे,आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, मध्यप्रदेशचे क्रीडामंत्री विश्वास सारंग, मध्य प्रदेश च्या खांडवा मतदार संघाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, रितेश सबाजकर, भुषण कोकाटे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या