Ticker

6/recent/ticker-posts

लाडक्या बहिणीला दर महिन्याला मिळणार १५०० वरून २१०० रूपये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लाडक्या बहिणीला दर महिन्याला मिळणार  १५०० वरून २१०० रूपये- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


 बाळापुर 
 प्रतिनिधी- गुलाब भाऊ अंभोरे 
 राज्याचे मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांची निवडणूक प्रचारर्थ वाडेगाव येथे जाहीर सभा आज 7 नोव्हेंबर रोजी पार पडली, सभेदरम्यान लाडक्या बहिणीला १५०० ऐवजी २१०० रु. देण्यास एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच जिल्हा शिव सेना पिंजरकर यांनी बाळापूर मधील आमदार वर घन घणीत आरोप केले. हल्लीचा आमदार खूप भ्रष्टाचारी आहे फक्तं स्वतःच कमिशन पाहतो. बाळापूर मध्ये काहीच उन्नति केलि नाही १०० कोटीच काम केलें. पणं उन्नति कोठेच दिसत नाही. असा भ्रष्टाचारी आमदार निवडून देउ नका असे भयंकर आरोप पिंजरकर यांनी केला. लाडक्या बहिण चे पैसे बंद करावे म्हणून विरुद्ध पार्टी न्यायालयात गेले होते परंतु न्यायालयाने त्यांच्या थोबाड्यात मारली, असे मुख्य मंत्री म्हणाले लाडक्या बहिण साठी मला कारागृहात जावे लागले तरी चालेल पण लाडक्या बहिणीचे पैसे बंद पडू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या