एमआयडीसी मध्ये प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यासाठी आ. सावरकरांच्या अधिकाऱ्यांना सूचना
अकोला
अकोला येथे औद्योगिक वसाहतीमधील शासन मंजूर प्रादेशिक कार्यालयाच्या नियोजीत जागेचे पाहणी करून प्रादेशिक कार्यालय तातडीने सुरु करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी midc च्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील प्रादेशिक कार्यालयांची संख्या वाढत्या औद्योगिकीकरणाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. तसेच सद्यस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात त्या अनुषंगाने कामकाजात वाढत्या औद्योगिक करणामुळे प्रचंड वाढ झालेली आहे. हे लक्षात घेता अकोला येथे अकोला वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील उद्योजकांच्या सोयी करिता अकोला येथे प्रादेशिक कार्यालय सुरु करण्या करिता आमदार रणधीर सावरकर सतत प्रयत्नशील होते. शासनाने ४ जुलै २०२४ रोजी सदर कार्यालय मंजूर केले. तथापि विधानसभेच्या निवडणुकी व आचार संहिता अशा कारणांनी कार्यालय सुरु करता आले नाही. सदर कार्यालय तातडीने सुरु करण्यात यावे या करता औद्योगिक वसाहतीमध्ये अग्नी शामक दलाच्या कार्यालय शेजारी असलेल्या निवासी गाळ्यामध्ये तातडीने तात्पुरते कार्यालय सुरु करण्यात यावे या करिता आमदार रणधीर सावरकर यांनी सूचित केले होते त्यांनुसार कार्यालय सुरु करण्याच्या नियोजित जागेची त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान वसाहतीमधील उद्योजकांचे मोठी उपस्थिती होती. या प्रसंगी त्यांनी उद्योजकांच्या समस्या समजून घेतल्या . सदरचे प्रादेशिक कार्यालय सुरु होत असल्याने या भागातील उद्योजकाना प्रदेश्य्क कार्यालयातील कामकाजाकरिता नाहक दूर अंतराचा प्रवास करावा लागणार नाही. नवीन प्रादेशिक कार्यालयाचे क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या मनुष्य बळाच्या पद निर्मितीस शासनाने मंजुरी दिली असून प्रादेशिक अधिकारी, व्यवस्थापक, क्षेत्र व्यवस्थापक, उप रचनाकार, प्रमुख भु मापक, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक , सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक व शिपाई पदांना शासनाने मंजुरी प्रदान केली आहे.
रोजगार निर्मिती करिता औद्य्योगिक विकासाला चालना देण्या करिता नव उद्योजकांची मागणी लक्षात घेऊन अकोला येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीचा ५ वा टप्पा उभा करण्याचा संकल्प आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान केला होता. ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्था बळकट करण्याकरिता तसेच रोजगार निर्मिती करिता लघु उद्योजकांचे जाळे निर्माण करण्यावर त्यांचा विशेष भर असून अकोला शहरालगत बाभूळगाव ते बोरगाव दरम्यान, अकोला वाशीम रोडवर लाखोंडा गावेचे आसपास तसेच घुसर ते आपातापा या भगत औद्योगिकी करणाला चालना देण्याचा मनोदय त्यांनी उपस्थित उद्योजकांचे समवेत स्पष्ट केला. औद्योगिकी करणाला चालना देण्या करिता उद्योजकांनी शेतकरीभिमुखता तसेच समाज संवेदनशीलता कायम राखून लघु उद्योगांना सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित उद्योजकांना केले,. या वेळी कार्यकारीअभियंता दाबेराव, उन्मेष मालू, आशीष चांदराणा, वसंतबाच्चुका, मनोज खंडेलवाल, नितीनबियाणी, नरेश बियाणी, कमलेश अग्रवाल, सुमितकोरडे, निखील अग्रवाल, राऊत, राजेश मुलाणी, अमित सराफ, पंकज बियाणी आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या