30 अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजेश कृपाशंकर मिश्रा यांचे जल्लोशात स्वागत
मतदारांनी दिला विजयाचा विश्वास
30 अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे उमेदवार राजेश मिश्रा यांचे आज सकाळची प्रचार पदयात्राचे जल्लोष्यात स्वागत करण्यात आले. आज सकाळी रेणुका माता मंदिर,गोड़बोलेप्लॉट, डाबकी रोड, अकोला आणि प्रभाग क्र.१० संपूर्ण परिसरात आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा हे आपले प्रेशर कुकर चिन्ह आणि ई व्ही एम
मधील अनुक्रमांक मतदारांपर्यंत पोहचवीण्यासाठी राजेश मिश्रा यांचे आतिषबाजी करीत ढोल ताश्याच्या निनादात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जल्लोष्यात स्वागत करीत राजेश मिश्रा यांना विजयाची हमी दिली. या प्रचार यात्रेचा समारोप काळा मारोती मंदिरजवळ, करण्यात आला.यावेळी मोठया संख्येने मतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या