पती-पत्नीवर सहा जणांचा सामोहिक हल्ला, विवरा येथील घटना : दोघांना अटक
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत विवरा येथे पती-पत्नी दोघांवर सहा जणांनी लोखंडी रॉड व धारदार शास्त्राने सामोहीक हल्ला केल्याची घटना ३१ ऑक्टोंबर रोजीच्या संध्याकाळी घडली, आहे. सदर घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संजय कोहळे, सुनील भाकरे, सुधाकर करवते, आदींनी तत्काळ घटनास्थळ गाठले, आणि जखमी पती पत्नी दोघांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले असून,पती पत्नी दोघांवर अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी जखमींच्या जबाबावरून चान्नी पोलिसांनी विवरा येथील सामोहीक हल्ला करणारे सहा आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, दोघे आरोपींना २ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली असुन, उर्रीत चार आरोपी फरार आहे.पुढील तपास ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहे.
प्रतिक्रिया
विवरा येथे पती-पत्नीवर हल्ला झाल्या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीवरून सहा आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील दोन आरोपींना अटक केली असुन, उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
संजय कोहळे तपास अधिकारी तथा उपनिरीक्षक पो. स्टे. चान्नी
0 टिप्पण्या