नालीच्या निकृष्ट बांधकामाची बिडिओकडे तक्रार
शिरपूर येथील प्रकार : संबंधित अभियंताचे दुर्लक्ष
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर पंचायत समिती अंतर्गत शिरपूर येथे नवीन वस्तीमध्ये नालीच्या निकृष्ट बांधकामाची तक्रार पातूरच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते शेख आरिफ यांनी सोमवार रोजी केली आहे. नालीचे बांधकाम करत असताना खोदकाम नकरता गिट्टी न टाकता, मातीवरच काँक्रिटीकरण करून नालीचे बांधकाम सुरू आहे. अभियंता व ठेकेदार यांची मिलीभागत असल्याने नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करून शासनाच्या पैशाचा दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाच्या नाली बांधकामाची मोका पाहणी करून कंत्राटदारावर कारवाई करा तसेच चौकशी केल्याशिवाय ठेकेदाराला देयक अदा करू नये, अन्यथा पातुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता शेख आरिफ यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून दिला आहे.
प्रतिक्रिया
नालीच्या बांधकामाची मोका पाहणी केली असून संबंधित ठेकेदाराला गिट्टीचा लेयर टाकून व्यवस्थित काम करण्याचे सांगितले आहे. अंदाजपत्रकानुसार काम झाल्याशिवाय देयक काढण्यात येणार नाही,
विठ्ठल शिंदे कनिष्ठ अभियंता प. स.पातूर
शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी
गाव पातळीवर मूलभूत सुविधेसाठी शासन लाखोंचा निधी उपलब्ध करून देत आहे. मात्र संबंधित अभियंता कंत्राटदारावर मेहरबान असल्याने शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होत असल्याचे चित्र आहे.
0 टिप्पण्या