अपहाराची चौकशीसाठी उपोषणाचा इशारा, वहाळा बु. ग्राम पंचायत सदस्यांचे सीईओना निवेदन
प्रतिनिधी नासीर शेख
पातूर : पातुर पंचायत समिती अंतर्गत वहाळा बु. येथे सचिव सरपंच यांनी विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखोंचे देयक हडपल्याची चौकशीसाठी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्राम पंचायत सदस्य संघपाल संसारे, कुसुम राजेंद्र मोरे, सौ, ललिता गजानन चोरे, सौ, संध्या सदानंद मोरे, यांनी सोमवार दि.२१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. विकास कामे कागदोपत्री दाखवून लाखोंचे देयक हडपले व १ जानेवारी २०२३ पासून आज पर्यंत म्हणजे २१ महिन्यापासून ग्रामसभा घेतली नाही,याबाबतची तक्रार
सीईओ, बीडीओ यांच्याकडे गेल्या तीन महिन्यापासून वारंवार करण्यात आली,परंतु अद्यापही दखल घेण्यात आली नाही. तसेच पातुर प. स. च्या संबंधित अधिकाऱ्याकडून मोका पाहणी न करता चौकशी बाबत तक्रार करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा माहिती न देता परस्पर कागदोपत्री चौकशी केल्याचा आरोप सदस्यांनी निवेदनद्वारे केला आहे.
प्रतिक्रिया
वहाळा बु. येथे सरपंच सचिव यांनी कागदोपत्री विकास कामे दाखवून लाखो रुपयांचे देयक हडपले, याबाबतची तक्रार वारंवार संबंधिताकडे तीन महिन्यापासून करण्यात आली, परंतु अद्यापही दखल घेण्यात आली नाही, लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्याकडून अभय दिले जात आहे. चौकशीसाठी आमरण उपोषणाला बसण्यात येईल
संघपाल संसारे सदस्य ग्राम पंचायत
वहाळा बु.
उच्च स्तरीय समिती गठित करून चौकशी करा-
विकास कामांची मोका पाहणी व हडपलेल्या लाखो रुपयांची देयक या सर्व प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करा आणि तक्रार करणारे व गावातील ग्रामस्थ यांच्या समक्ष चौकशी करून दोषीवर कारवाई करा अन्यथा सीईओ कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
0 टिप्पण्या