Ticker

6/recent/ticker-posts

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू


अकोला : सिव्हील लाइन पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या धिंग्रा चौकातील उड्डाणपुलावर टिप्परच्या वाहनाच्या धडकेत एका २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी सिव्हील लाइन्स पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे. ध्रुव कुमरे वय २० वर्ष राहणार कैलास टेकडी, अकोला असे मृत युवकाचे नाव आहे.


शनिवारी रात्री हा युवक उड्डाणपुलावरून दुचाकी क्र. एम एच ३० बी, एम-६१३८ ने जात होता. यावेळी त्याला टिप्परची धडक लागली. या धडकेत ध्रुव कुमरे हा जागीच ठार झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाइन पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या