दिव्यांग कर्मचारी यांना निवडणूकीच्या कामातून वगळण्यात यावे
अकोला
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना अकोला चे वतीने मा. जिल्हाधिकारी साहेब यांना आज रोजी निवेदन देण्यात आले. त्या निवेदनातून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे ही मागणी करण्यात आली. निवडणूक आयोगाने व शासननिर्णयाप्रमाणे दिव्यांग कर्मचारी यांना सुट देण्याचे आदेश आहेत. त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचे निवडणूक काम देण्यात येऊ नये. तसेच चुकून एखाद्याचा आदेश आला आणि त्याने विनंती केली तर त्याला सुद्धा वगळण्यात यावे. तसेच महत्त्वाचे व्ही.आय.पी. आयडीयल बुथवर सुद्धा दिव्यांग कर्मचारी यांना देण्यात येऊ नये. मागिल लोकसभा निवडणुकीत अशा बुथवर कमोट टाॅयलेट, उपलब्ध नव्हते. त्यामुळे खुप गैरसोय झाली. दिव्यांग कर्मचारी यांच्या समस्या इतरांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्या समस्या शब्दात व्यक्त केले जात नाहीत. त्यामुळे सरसकट सर्व दिव्यांग कर्मचारी यांना निवडणूक कार्यातून वगळण्याची मागणी. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. निवेदन देण्यासाठी श्री.संजय बरडे अध्यक्ष,मो.अ.अजीज सचिव, दिलीप सरदार कोषाध्यक्ष, जावेद इक्बाल माध्यमिक शिक्षण विभाग, रविंद्र देशमुख उपाध्यक्ष, सुभाष पिसे संचालक, दिपक वाघमारे सहसचिव, यांचेसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या