Ticker

6/recent/ticker-posts

शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज अर्ज दाखल, सविस्तर वाचा कोणी कुठून भरला अर्ज

शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज अर्ज दाखल


अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात आज 100 जणांनी 128 अर्ज सादर केले. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज अर्ज दाखल केले.



निवडणूक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार.. 

अकोट मतदारसंघात आज 20 उमेदवारांनी 25 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 22 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले. 

अकोट मतदारसंघात दिवाकर गवई (अपक्ष), *महेश* गणगणे (काँग्रेस चार अर्ज), ॲड. सुजाता वानखडे (बसपा), अन्सारउल्लाह खान (अपक्ष), रामकृष्ण ढिगर (अपक्ष), दीपक बोडखे (वंबआघाडी तीन अर्ज), गोपाळ देशमुख (अपक्ष), गजानन महाले (अपक्ष), गजफ्फर खाँ मुजफ्फर खाँ (अपक्ष), ललित बहाळे (अपक्ष), रामप्रभू तराळे (अपक्ष), देवेंद्र पायघन (अपक्ष), नितीन वालसिंगे (अपक्ष), सय्यद यावरअली (अपक्ष), सुनील डोबाळे (मनसे), प्रकाश भारसाकळे (भाजप), अ. सादिक अ. खालिक (अपक्ष), सय्यद मुजीब उर रहमान (अपक्ष), सुभाष रौंदळे (अपक्ष), यशपाल चांदेकर (पीपल्स पार्टी डे.) यांनी अर्ज दाखल केले.


बाळापूर मतदारसंघात आज 19 उमदेवारांनी 24 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले. 

खतीब सय्यद नातिकोद्दीन यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे चार अर्ज, अमोल घायवट (अपक्ष), राजनारायण रतन कांबळे (अपक्ष), शे. कलीम शे. मजीद (अपक्ष), नितीन देशमुख (अपक्ष), रमेश उभे (अपक्ष), राजेश दादाराव देशमुख (अपक्ष), अनिल तेजा (अपक्ष), श्रीकृष्ण घ्यारे (अपक्ष), सुनील शिरसाठ (अपक्ष), बळीराम शिरस्कार (शिवसेना), सुरेश डोंगरे (अपक्ष), श्रीकृष्ण अंधारे (अपक्ष), शिवकुमार बायस (अपक्ष), राजकुमार शेळके (अपक्ष), प्रमोद कदम (अपक्ष), मंगेश गाडगे (मनसे), रईस अहमद (अपक्ष), संजय फाटकर (अपक्ष), प्रकाश डिवरे (अपक्ष), प्रमोद पोहरे (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.

अकोला पश्चिम मतदारसंघात आज 19 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 23 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले.

अकोला पश्चिम मतदारसंघात विजय अग्रवाल (भाजप- दोन अर्ज), सुमंत तिरपुडे (पी. पार्टी ऑफ इंडिया डे.), सुनील शिरसाठ (अपक्ष), मो. सोहेल मो. हुसेन (सोशल डेमॉ. पार्टी), प्रशंसा अंबेरे (मनसे), राजेश मिश्रा (शिवसेना (ठाकरे) आणि एक अपक्ष), संजय बडोणे (अपक्ष), हरिश आलिमचंदानी (अपक्ष), दिनेश श्रीवास (लोकतांत्रिक जनाधार पक्ष आणि एक अपक्ष), भगवान दंदी (अपक्ष), मदन भरगड (अपक्ष), साजिद खान म. खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 3 अर्ज), अशोक ओळंबे (प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज), राजेश वर्मा (अपक्ष), बन्सीलाल प्रजापती (अपक्ष), जिशान हुसैन (वं. ब. आघाडी), प्रकाश डवले (अपक्ष-२ अर्ज) भरतकुमार मिश्रा (अपक्ष), नंदकिशोर ढोरे (अपक्ष), मिर्झा इम्रान बेग (रासप)


अकोला पूर्व मतदारसंघात आज 16 उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले.. आतापर्यंत 23 जणांनी 37 अर्ज दाखल केले

अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर 2 अर्ज , सुभाषचंद्र कोरपे अपक्ष 2 अर्ज, गणेश गिरी (अपक्ष),विशाल भगवान पाखरे (अपक्ष), बहुजन समाज पार्टीकडून हर्षल देवानंद दामोदर, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक कडून जीवन पुनाजी गावंडे, भानुदास कांबळे (अपक्ष), संजय गोपाळराव आठवले दोन अर्ज (अपक्ष), 
 
वंचित बहुजन आघाडी कडून ज्ञानेश्वर सुलताने, विजय श्रीकृष्ण मालोकार (अपक्ष), सुधाकर फुलचंद पवार (अपक्ष), डॉ संतोष श्रीकृष्ण हूसे (अपक्ष), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून आशिष रामराव दातकर तीन अर्ज ,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून देवश्री किशोर ठाकरे, संजय वानखडे (अपक्ष), राष्ट्रीय समाज पक्षाकडून आनंद गोठकडे यांनी अर्ज दाखल केले.


मूर्तिजापूर मतदारसंघात 26 उमेदवारांनी 31 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 32 व्यक्तींनी 38 अर्ज दाखल केले.

मूर्तिजापूर मतदारसंघात किशोर ज्ञानेश्वर तायडे (अपक्ष), पंकज साबळे (अपक्ष), सिद्धार्थ डोंगरे (अपक्ष), सुनील वानखडे (अपक्ष), सचिन कोकणे (रिपाइं- ए), रवींद्र पंडित (अपक्ष), सुगत वाघमारे (वंबआघाडी दोन अर्ज), पुष्पाताई महादेवराव इंगळे (अपक्ष), अंकिता राजू शिंदे (अपक्ष), हरिश पिंपळे (भाजप दोन अर्ज), रवी राठी (अपक्ष दोन अर्ज), संतोष इंगळे (अपक्ष), राजकुमार नाचणे (अपक्ष दोन अर्ज), श्रावण खंडारे (पीपल्स पार्टी- डे.), दयाराम घोडे (अपक्ष), यशवंत इंगोले (अपक्ष), गोपाळराव कटाळे (अपक्ष), भाऊराव तायडे (अपक्ष), विनोद सदाफळे (अपक्ष), राजश्री खडसे (अपक्ष), अरूण गवई (अपक्ष), महेश घनगाव (अपक्ष), महादेव गवळे (अपक्ष), गजानन वजीरे (अपक्ष), सम्राट सुरवाडे (एमआयएम), भिकाजी अवचार (मनसे), वंदना वासनिक (रिपाइं – ए) यांनी अर्ज दाखल केले. 

*राष्ट्रीयकृत पक्ष*
अकोट मतदारसंघात भाजपतर्फे प्रकाश भारसाकळे, काँग्रेसतर्फे मनीष गणगणे, वंचित बहुजन आघाडीतर्फे दीपक बोडखे, बहुजन समाज पक्षातर्फे डॉ. सुजाता वानखडे, मनसेतर्फे सुनील डोबडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्राटिकतर्फे राजपाल चांदेकर यांनी अर्ज दाखल केले.
बाळापूर मतदारसंघात शिवसेनेतर्फे बळीराम शिरस्कार व मनसेतर्फे मंगेश गाडगे यांनी अर्ज दाखल केला.
अकोला पश्चिममध्ये बसपतर्फे धनंजय नालट, भाजपतर्फे विजय अग्रवाल, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमॉ.)तर्फे सुमन तिरपुडे, मनसेतर्फे प्रशंसा अंबेरे, लोकतांत्रिक जनाधार पक्षातर्फे दिनेश श्रीवास, काँग्रेसतर्फे साजिद खान मन्नान खान, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अशोक ओळंबे, वंचित बहुजन आघाडीतर्फे जिशान हुसेन, राष्ट्रीय समाज पक्षातर्फे मिर्झा इम्रान बेग मिर्झा, सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे मो. सोहेल मो. हुसेन यांनी अर्ज दाखल केला. 
अकोला पूर्व मतदारसंघात भाजपतर्फे रणधीर सावरकर, बसपतर्फे हर्षल दामोदर, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डे.) तर्फे जीवन गावंडे, वं. ब. आघाडीतर्फे ज्ञानेश्वर सुलताने, शिवसेना (ठाकरे) तर्फे आशिष दातकर, शिवसेना (ठाकरे)तर्फे देवश्री ठाकरे, रासपतर्फे आनंदराव गोठकडे यांनी अर्ज दाखल केला.
मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपतर्फे हरिश पिंपळे, एआएएमआयएमतर्फे सम्राट सुरवाडे, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रवी राठी, वं. ब. आघाडीतर्फे सुगत वाघमारे, रिपाइं(ए)तर्फे सचिन कोकणे, देश जनहित पार्टीतर्फे किशोर तायडे, पीपल्स पार्टी (डे.) तर्फे श्रावण खंडारे, मनसेतर्फे भिकाजी अवचार आदींनी अर्ज दाखल केला.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या