Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा, आमदार सावरकर यांची मागणी

अकोला जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा, आमदार सावरकर यांची मागणी 

अकोला
अकोला सतत पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व अर्थव्यवस्था बाधित झाली असून शेताचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडलेला आहे राज्य शासनाने अकोला जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून त्वरित शेतकऱ्यांना व ग्रामीण नागरिकांना सुविधा देण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस तूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे त्यामुळे अकोला जिल्हा ओला दुष्काळ घोषित करावा. तसेच ग्रामीण भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून त्यासाठी सुद्धा निधी देण्यात यावा अकोला जिल्ह्यात दुष्काळ म्हणून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी जिल्हा भाजपाने सुद्धा केली असून भाजपाचे खासदार अनुप धोत्रेआमदार सर्वश्री प्रकाश भारसाकले, हरीश पिंपळे वसंत खंडेलवाल किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत मसने संतोष शिवरकर श्रीकृष्ण मोरखडे रमेश दुतोंडे, माधव मानकर अंबादास उबाळे, अशोक राठोड, वैशाली वैशाली निकम, बळीराम सिरस्कार, तेजराव थोरात यांनी सुद्धा मागणी केली.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या