आ. सावरकर यांच्या विशेष निधीमधून विविध विकास कामांचे खा. धोत्रे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व लोकार्पण
अकोला
देवरी आणि केळीवेळी येथे आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या विशेष निधीमधून विविध विकास कामांचे मा. खासदार अनुपभाऊ धोत्रे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
ग्रामीण भागातील विकासाचा सतत ध्यास घेणारे आमदार रणधीर सावरकर यांनी विविध योजना अंतर्गत मौजे देवरी आणि केळीवेळी येथे रस्ते विकासाच्या कामांचा भूमिपूजन आणि लोकांर्पण सोहळा माननीय युवा खासदार अनुप भाऊ धोत्रे यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आला. मौजे देवरी येथे अकोला ते अकोट महामार्गापासून देवरी गावापर्यंत इजिमा ८ या 1.40 किलोमीटर लांबीचा रस्ता एकूण खर्च 99.99 लक्ष रुपये तसेच भीमराव तायडे यांच्या घरापासून रामदास बोरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच मौजे केळीवेळी येथे ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास पर्यटन अंतर्गत पुरातन महादेव मंदिराच्या विकास कामांसाठी 50 लाख रुपये, राजर्षी शाहू महाराज चौक ते श्री तायडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता २० लाख रुपये, जिल्हा परिषद शाळेपासून श्रीनाथ यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता १० लाख रुपये , श्री कॉलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता १० लाख रुपये, निरंजन भटकर ते देविदास भटकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता तसेच श्री तायडे यांच्या घरापासून अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता अशा कोट्यवधी रुपयांची अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आज पार पाडण्यात आला, कार्यक्रमासाठी मौजे केळीवेळी आणि देवरी या पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाला बाळासाहेब फोकमारे महादेव कवळकर पंकज फोकमारे डॉक्टर योगेश फोकमारे राजू गायकवाड राजेश रावणकर अनिल मिसाळ राजू नागमते प्रवीण डुक्कर किशोर सरोदे अनुप साबळे माजी न्यायाधीश सुभाष फोकमारे सरपंच वर्षा गायकवाड उपसरपंच सौ बोरचाटे मोहन सावरकर मधु पाटकर संतोष शिवरकर विनोद मंगळे दादाराव पेठे दत्तू पाटील गावंडे ज्ञानेश्वर आडे माधव बकाल गजानन नळे किशोर घुले विवेक भरणे दिनकर गावंडे कैलास ठाकूर राजेश अग्रवाल शिवा वानखडे माधव बाठे पुरुषोत्तम नळे संजय गावंडे डॉक्टर बुले विठ्ठल हिवरे गजानन मोंढे जगदीश मोंढे ओंकार बेंडे शरद नळे संदीप अरबट नंदू अरबट संजय बागलकर मोहन गावंडे सरपंच गोपाळ गावंडे निलेश वाघोळे रोशन वानखडे विठ्ठल वाकोडे चेतन डोईफोडे हरिभाऊ आवारे आदी उपस्थित होते,
0 टिप्पण्या