Ticker

6/recent/ticker-posts

शिवनी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

शिवनी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा

अकोला
 आज यंग मुस्लिम एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी पातूर व्दारा संचलित सैयद मोहसीन उर्दू हायस्कूल शिवनी येथे महान शिक्षणतज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठया उतसाहत साजरा करण्यात आली कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये विभाजन करण्यात आले .पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली असून वर्गात तासिका घेतली आणि दुसऱ्या सत्रा मध्ये शाळेचे मुख्याध्यापक सैयद मोहिब इकबाल यांच्या अध्येक्षते खाली सांसकतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


         या कार्यक्रमा मध्ये प्रमुख अतिथी महणुन अलहाज मुख्तार सहाब व इरफान अंजुम सहाब होते या कार्यक्रमाची प्रसतावणा शाळेचे सहायक शिक्षक असीमोदीन सर यानी केले त्या नंतर अल्हाज मुखतार सर यानी 05 सप्टेबर दिनाच्या अवचीत्य साधुन भारताचे दुसरे राष्टरापती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकुष्णन यांच्या जिवणावर प्रकाश टाकले व तसेच इरफान अंजुम सरानी शिक्षक दिना निमीत्त विधार्थ्याना प्रेरणादायी मार्गदर्शन केले वतसेच ८वी ते १२ वी च्या विधाथ्यानी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रारंभिक जीवनापासून भारताचे राष्ट्रपती होईपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सुत्र संचालन अजल्फा अनम यानी केले तर आभार प्रदशन मो जाहीद सर यानी केले कार्यक्रमाला यशस्वी करण्या करीता शमशेर खान खान अजमतुलाह काजी मोइनोदीन मो फारुख सैयद वसीम अब्दुल शकुर यानी परीश्रम घेतले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या