खेट्रीच्या उर्दू हायस्कूल मध्ये शिक्षक दिवसानिमित्त सत्कार
प्रतिनिधी नासीर शेख
राधाकृष्णन यांनी शिक्षकांच्या समाजातील अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने ५ सप्टेंबर म्हणजेच त्यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्याची विनंती केली, आणि तेव्हापासून दरवर्षी भारतात ५ सप्टेंबर रोजी 'शिक्षक दिन' साजरा केला जाते, यानिमित्ताने पातूर तालुक्यातील खेट्री येथे मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू हास्कूल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गिफ्ट देऊन सत्कार केला, तसेच या शाळेतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आज रोजी विविध पदावर कार्यरत आहे. त्यांच्याकडून सुद्धा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यात आले,यावेळी माजी विद्यार्थी डॉ. इर्शाद शह, डॉ. हमिद,शिक्षक नईम खान, फहीम खान, इमरान खान,रोजगार सेवक संघटना पातूर तालुकाध्यक्ष टी टी खान, एम आर गाजी खान, शे. लुकमान, नसीब खान,इर्शाद खान,अब्दुल रहीम,अब्दुल शहाद, बिलन खान, मो. अन्सार, अफरोज खान, मुजाहिद बेग, शे. अय्युब,आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या