Ticker

6/recent/ticker-posts

सातत्याने पक्ष विस्तारासाठी काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी हीच भाजपाची ताकद- आ. सावरकर

सातत्याने पक्ष विस्तारासाठी काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी हीच भाजपाची ताकद- आ. सावरकर


अकोला 
भारतीय जनता पार्टी माझी आई असून या आईवर प्रेम करणारे व मतभेद असले तरी पक्षाच्या विरोधात काम करणारे, गेल्या तीन पिढीपासून काम करणारे, सातत्याने पक्ष विस्तारासाठी काम करणारे कार्यकर्ते पदाधिकारी हीच भाजपाची ताकद असल्याची प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी करून तेल्हारा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भावना जाणून त्यांना जिल्हा पदाधिकारी म्हणून तसेच पक्षाचे काम करण्याचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे गौरव केला व त्यांची अभिनंदन केले यावेळी सर्वसमावेशक तालुका कार्यकारणी ची घोषणा करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किशोर पाटील होते तर तेजराव थोरात, विजय अग्रवाल प्रभाकर मानकर जयंत मसने, डॉक्टर बाबुराव शेळके वसंत बाछुका नथू शेळके गजानन नळकांडे केशवराव ताथोड रवी गाडोदिया रमेश लखन राजनकर सतीश जयस्वाल ज्येष्ठ नेते महेंद्र गोयंका विजय देशमुख उमेश पवार राजू टोहरे अतुल विखे जयश्रीताई फुंडकर आधी विराजमान भाजपा कार्यालयात उपस्थित होते.


 यावेळी खासदार अनुप, संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल तेजराव थोरात माधवराव मानकर संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर डॉक्टर यांच्याशी चर्चा विनिमय करून जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील यांची मान्यता घेऊन तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर यांनी कार्यकारिणीची घोषणा केली उपाध्यक्ष म्हणून सर्वश्री ज्ञानेश्वर वाघोळे श्रीकांत भारसाखळे जिल्हा परिषद सदस्य सुलभाताई धुंडे संजय राजनकर संजय भिसे राजकुमार नेमाडे अमृताताई राऊत दिलीप पोटे यांच्याकडे उपाध्यक्ष म्हणून तर सरचिटणीस म्हणून पण पुंजाजी मानकर गणेश रोठे मधुकर कुकडे संदीप पालीवाल यांच्याकडे जबाबदार देण्यात आली तर चिटणीस म्हणून सागर ठाकरे अनुपमाड गोपाल नथू शेळके प्रकाश कोरडे ज्ञानेश्वर सरफ विठ्ठल भाकरे राजू कोषाध्यक्ष म्हणून राजेश बुरघाटे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून रविष शर्मा तर कार्यकारी सदस्य म्हणून अरुण खडसे राजू बगले सतीश शेळके प्रवीण वाळूकर विलास महाले गणेश उन्हाळे भास्करराव धांदळे गजानन पार्थिपात्रीकर अजय माडुकार बाळूभाऊ वाकोडे वाकोडे विद्याधर अवताडे प्रवीण भाकरे संतोष इंगळे जगदीश टेकाळे बाळूभाऊ कुकडे दीपक ठाकूर राजू वडदकार परमेश्वर साबळे महादेवराव नागे निलेश बोदळे डॉक्टर रमेश जयस्वाल सत्यनारायण नेमाडे पाली माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाताई चंदन नीताताई खंडाळकर प्रकाश कोकाटे शिरीष पोकमारे यांची निवड करण्यात आली ओम सुई वाले यांच्याकडे शहर अध्यक्ष म्हणून तर तालुका जनता युवा मोर्चा ची जबाबदारी गणेश इंगोले शेतकरी आघाडीची प्रमुख म्हणून विजय तेलारकर महिला आघाडी म्हणून सुनील ताई बगाडे अनुसूचित जाती अनिल कवळकार अल्पसंख्याक आघाडी म्हणून खुश दिल खान आताऊल्ला खान सहकार आघाडी अतुल विखे इतर मागासवर्गीय आघाडी बजरंग तिडके वैद्यकीय आघाडी डॉक्टर ऋषिकेश चोपडे अनुसूचित जमाती दिनेश मावसे सोशल मीडिया प्रमुख म्हणून गोकुल हिंगणकर जेष्ठ नागरिक आघाडी पद्माकर आकडे तालुका संपर्कप्रमुख म्हणून रमेश दुतोंडे दिव्यांक आघाडीचे शालिग्राम फोकमारे प्रशिक्षण प्रमुख म्हणून प्रकाश बरिंगे हिवरखेड शहराध्यक्ष, प्रवीण येऊल, यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचा संचालन केशव ताथोड तर प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन महेंद्र गोयंका यांनी केले



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या