Ticker

6/recent/ticker-posts

अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांसाठी आंदोलन


अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांसाठी आंदोलन 

अकोला
 महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक/ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्यासंदर्भात महा. राज्य (का) विनाअनुदानित शाळा कृती समिती अकोला, विदर्भ मुख्याध्यापक संघ संलग्न असलेल्या अकोला जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, यांचे वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेले आहे. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी होते. आज आंदोलनाचा दुसरा दिवस असून आंदोलन पुढे तीव्र होणार असल्याचेही शिक्षक कर्मचाऱ्यांनी सांगितले.


 राज्यातील अंशतः अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलीत धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा, 1 नोव्हेंबर 2005 पुर्वी नियुक्त आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर अनुदानावर आलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू करावी, 15 मार्च 2024 चा सुधारीत संच मान्यता शासन निर्णय रद्य करून शाळा तेथे मुख्याध्यापक पद हे धोरण जाहीर करावे, मागील दोन तिन वर्षापासुन शाळांची योग्य पटसंख्या असुनही त्रुटीपूर्ण संचमान्यता देण्यात आलेल्या आहेत. अश्या त्रुटीपूर्ण संचमान्यता त्वरीत दुरूस्त करून देण्यात याव्यात. या आणि अशा इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे. सुरज मांढरे, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे संपत सुर्यवंशी यांना देण्यात आले आहे. 


 यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुष्न बिरकड, सुधाकर वाहुरवाघ बाळक़ष्ण गावंडे, निलेश खेडकर, असीमोदीन सर, वसंत वाघ, उधव कालपांडे, राजेश बावणे, अ पी सोनोने, पी बी तायडे, नोमान उललाहखान, शोएब मेराज, जी एस जाधव, दिनेश तायडे, विजय ठोकळ, अकोला जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बळीराम झामरे, उपाध्यक्ष गजेंद्र काळे, आनंद साधु, प्रकाश डवले, माधव मुंशी आदी संख्याने शिक्षक उपसिथीत होते.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या