Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापुरी पद्धत बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापुरी पद्धत बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न


अकोला
आज मतदारसंघातील लाखोंडा बु.आणि लाखोंडा खु.येथील कोल्हापुरी पद्धत बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.अकोला जिल्ह्यातील खारपाण पट्टा यादी मध्ये समाविष्ट असलेल्या या गावातील वाहणाऱ्या नाल्यांवर सुमारे ०४ कोटी रुपये खर्च करून दोन बंधारे बांधण्यात आले आहे.यामुळे सुमारे ४१ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न यामुळे सुटणार आहे. या कार्यक्रमाला आ. रणधीरभाऊ सावरकर प्रामुख्याने उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थित गावकऱ्यांशी संवाद साधला. सिंचानाचा प्रश्न सुटल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिक प्रयत्न मी करू शकलो यामुळे होणारा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही आहे.


यावेळी श्री.परशराम महाराज संस्थान लाखोंडा चे अध्यक्ष शंकरराव खवले जी,अंबादासजी उमाळे,अनिल गावंडे,भरत काळमेघ,राजेश बेले,दादाराव पेठे,किशोर रामाघरे,श्रीकांत पागृत,श्रीकृष्ण झटाले,लाखोंडा सरपंच जगदीश शिरसाट,प्रितेश म्हातुरकर,गणेश अंधारे,दादाराव पाटील कांगटे व गावातील नागरिक व पंचक्रोशीतील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


शहराच्या विकास निधी आणण्यासाठी खा.अनूपजी धोत्रे यशस्वी चर्चा 

आज महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या निवासस्थानी मोर्णा नदी पूर नियोजन,सांडपाणी प्रक्रिया केंद्र,अमृत योजना प्रस्ताव,व्यवस्थापन नॅशनल डिझास्टर फ्लड NDRF मॅनेजमेंट डिझास्टर फ्लड मॅनेजमेंट SDRF चा निधी अकोला शहरासाठी कसा आणता येईल यावर खा.अनूपजी धोत्रे यांनी चर्चा झाली तसेच पंतप्रधान आवास योजना 2 यामध्ये उरलेल्या लोकांना घर कसे प्राप्त होतील यावर चर्चा झाली.शहरातील ओपन स्पेस ताब्यात घेऊन त्याचे व्यवस्थापनाबाबत चर्चा झाली,केंद्र सरकारकडून येत्या काळात येणाऱ्या ईबसेस फायदेशीर रित्या अकोला शहरात कशा चालतील या विषयी ही चर्चा झाली.


यावेळी डॉ सुनील लहाने आयुक्त मनपा अकोला,अमोल डोईफोडे कार्यकारी अभियंता मनपा अकोला,अजय गुजर कार्यकारी अभियंता मनपा अकोला,श्री शैलेश चोपडे अभियंता यांत्रिकी पाणीपुरवठा विभाग,चेतन बोरे कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग मनपा अकोला व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होते...


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या