Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ तातडीने सर्व गरजू लाभार्थ्यांना देण्यात यावा, आमदार रणधीर सावरकर यांनी घेतली आढावा बैठक

पंतप्रधान आवास योजनेचा लाभ तातडीने सर्व गरजू लाभार्थ्यांना देण्यात यावा, आमदार रणधीर सावरकर यांनी घेतली आढावा बैठक

अकोला
 पंतप्रधान आवास योजना प्लस च्या ड यादीमधील पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना तातडीने घरकुल आवास योजनेचा लाभ देण्यात यावा. ड यादीमधील लाभार्थींना पात्रतेचे निकष लावताना केंद्र शासनाने गरीबीचे निकष बदलले असून रोजगार हमी योजनेच्या जॉब कार्ड वरील नावे प्राधान्याने घेण्यात आली असली तरी उर्वरित लाभार्थी सुद्धा आवास योजनेचा लाभ मिळणार आहे लाभार्थ्यांची नावे खाली वर झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम दूर करून याबाबत नागरिकांनी चिंता करू नये असे आमदार रणधीर सावरकरांनी यांनी स्पष्ट केले आहे जिल्ह्यात एकूण 51,542 लाभार्थींना पीएम आवास योजनेचा लाभ देण्यात येणार आहे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाचा लाभ देण्यासंबंधी डीआरडीएचे प्रकल्प संचालक मनोज जाधव यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकरांनी यांनी योजनेचा सविस्तर आढावा घेतला आढावा बैठकीच्या वेळी जिल्ह्यातील सरपंच हर्षल भाऊ गोंडचर नारायण बोर्डे राजेश बेले अनिल गावंडे अंबादास उमाळे वैभव माहोरे अंकुश इंगळे शरद कराळे सतीश भाले प्रथमेश मातुरकर श्रीकृष्ण झटाले संजय कोरडे आदी उपस्थित होते,



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या