Ticker

6/recent/ticker-posts

शाळांना पुढील टप्पा वाढ अनुदानासाठी शिक्षक आक्रमक

शाळांना पुढील टप्पा वाढ अनुदानासाठी शिक्षक आक्रमक 



अकोला
महा. राज्य (का) विनाअनुदानित शाळा कृती समिती अकोला चे वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू झालेले आहे. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी होते. जोपर्यंत अनुदाना वितरणाचा शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे.



अकोला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे टप्पा वाढ अनुदानाकरिता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने ६ ऑगस्ट २४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला या कार्यालया समोर धरणे आंदोलन आयोजित केले.  शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आंदोलन ठिकाणी टप्पा अनुदान वाढ शासन निर्णय काढण्याची विनंती केली आहे.अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान द्यावे, याबाबत तत्काळ जीआर काढावा, या मागण्यासाठी अंशतः अनुदानित शिक्षकांनी राज्यभर तालुका, जिल्हा, विभाग स्तरावर विविध प्रकारचे आंदोलन सुरू केले आहे.


आज 6 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले तर 12 ऑगस्ट रोजी अमरावती येथे विभागीय शिक्षण उसंचालक कार्यालयावर एकत्र येऊन मोर्चा राहील, 13 ऑगस्ट रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती येथे बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे शिक्षकांनी निवेदनातून सांगितले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या