सक्षम अकोला पोलीसांचा उपक्रम बालकांना वैयक्तिक सुरक्षा ज्ञानाने बळकट करतो- बच्चन सिंह पोलीस अधीक्षक, अकोला
अकोला पोलीस दल विविध जनजागृती पर उपक्रम राबविण्यात येत असतात, दामिनी, जननी, चिडीमार विरोधी पथक, बालक जनजागृती सप्ताह, परंतु पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोला जिल्याचा पदभार संभाळ्या पासुन सक्षम विदयार्थी सूरक्षा व सुरक्षात्मक उपाय योजना जनजागृती अभियान पुर्ण जिल्हाभर सुरू केले आहे. दामिनी पथकाचा विस्तार करून दामिनी मार्शल सुरु करण्यात आल्या, त्यामध्ये विधार्थी संवाद साठी शाळा भेटी उपक्रम सुरु करण्यात आला, बालकांची वैयक्तिक सुरक्षितता आणि खबरदारी घेण्याच्या उद्देशाने माय बॉडी, माय सेफ्टी या वाक्याला घेऊन मुलांना सुरक्षीतेचे धडे देवुन त्यांना सजग करण्यासाठी व्हीडीओ, माहिती पत्रक, तसेच मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करून मुलांना कायदेविषयक बाबी सांगुन त्यांना कायदयाप्रती साक्षर करण्याचा मुख्य उद्देश या अभियानाचा आहे. पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या संकल्पनेतून सक्षम उपक्रमा अंतर्गत, आताच्या सायबर युगात आपण सर्व सिटीझन नेटीझन झाले आहोत. त्यामुळे त्याचा परिणाम कळत न कळत मुलावर सुध्दा होत आहे, सायवर बुलिंग, सायबर गृमिंग सारख्या समस्यांना मुलं सामोरे जातांना दिसतं आहेत ते होऊ नये यासाठी मुलांना कार्यशाळेच्या माध्यमातून सायबर साक्षर करण्यात येत आहे. तसेच वैयक्तिक जागा आणि सीमा समजून घेणे, चांगले आणि वाईट स्पर्श ओळखणे, सुरक्षा नियम आणि प्रतिसाद धोरणे कशी असावी याबाबत मुलांना व्हिडिओ च्या माध्यमातून सहज समजाऊन सांगितल्या जातात.
सायबर जगतात वावरतांना कशी खबरदारी यासाठी काय उपाय योजना करता येतील याबाबत माहिती देऊन मुलांचा आत्मविश्वास वाढविण्यात येत आहे कोणतेही संकट आपल्यवार आल्यावर घाबरून न जाता त्यांचा सामना कसा करावा, त्यासाठी काय उपाय योजना कराव्या याबाबतची माहीती देण्यात येते. आपला बॉडीगार्ड कोण त्याचे सोबत आपण कसा संवाद करावा याबाबतची माहिती देण्यात येते. एकंदरीत मुलांचा आत्मविश्वास वाढवुन त्यांना समक्ष करण्यात येत आहे. या उप्रकमामध्ये आता पर्यन्त ७ शाळा वर कार्यशाळा घेण्यात असुन मा पोलीस अधीक्षक यांनी स्वतः प्रभात किड्स स्कूल, नोएल स्कूल येथील विध्यार्थी सोबत संवाद साधून मार्गदर्शन केले आहे. यापुढे हि हा उपक्रम सुरू राहणार आहे यामध्ये आपण सुद्धा सहभागी होवु शकता, हा उपक्रम बालका पर्यन्त सिमीत न करता सर्व जनते मध्ये कायदयाप्रती जागृती निर्माण करणे हा आहे, यासाठी सर्व शाळा, कॉलेज, व्यतिरिक्त एनजीओ, सामाजिक संघटना यांच्या सहकार्यातून सक्षम अभियान अजुन प्रभावीपणे राबविण्याचा मानस पोलीस अधीक्षक यांचा आहे. त्या करीता अकोला पोलीस यांच्या मेल वर आपण sp.akola@mahapolice.gov.in संपर्क करावा असे प्रसिदधी पत्रकाव्दारे कळविण्यात येत आहे.
0 टिप्पण्या