Ticker

6/recent/ticker-posts

मूळ दस्तऐवज देण्यास नर्सिंग महाविद्यालय प्रशासनाची टाळाटाळ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

मूळ दस्तऐवज देण्यास नर्सिंग महाविद्यालय प्रशासनाची टाळाटाळ, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान 

अकोला
महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालय, अकोला येथे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या ANM व GNM या व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता विद्यार्थ्याकडून त्यांचे मूळ दस्तऐवज घेण्यात आले होते. सदर विद्यार्थिनींचे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होऊन त्यांचे मूळ दस्तऐवज देण्यास महाविद्यालय प्रशासन टाळाटाळ करीत होते. याबाबतची माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे यांना माहिती पडताच त्यांनी महाविद्यालयात धाव घेऊन महाविद्यालयातील प्रशासनाला धारेवर धरून सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने ज्या विद्यार्थ्यांचे मूळ दस्तऐवज राहिले होते त्यांना ते मूळ दस्तऐवज देण्यात येतील अशी माहिती महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे यांना दिली.


            यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हाध्यक्ष इंजि. धिरज इंगळे प्रसिद्धी प्रमुख अक्षय डोंगरे, सह-प्रसिद्ध प्रमुख अंकित इंगळे, उपाध्यक्ष अनिकेत शिरसाट, अ‍ॅड.श्रीकांत वाहुरवाघ, सचिव राहुल खाडे, सह-संघटक अ‍ॅड. ऋषिकेश इंगळे, सोशल मीडिया प्रमुख प्रथमेश गोपणारायन, सह-सोशल मीडिया प्रमुख अंकुश धुरंदर, सदस्य अंकित इंगळे, सोमेश दाभाडे, बिट्टू खंडारे, अभय इंगळे आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या