Ticker

6/recent/ticker-posts

आण्णाभाऊ साठे जयंती दिनी रक्तदान करून वाहिली आदरांजली

मुर्तीजापुर येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती दिनी रक्तदान करून वाहिली आदरांजली


प्रतीनीधी-  नागोराव तायडे
नेहरू युवा केंद्र अकोला क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा संचालित नेहरू युवा बहु . क्रिंडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी, मुर्तिजापुर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती मूर्तिजापूर व श्री आईबाबा बंहू संस्थ सालतवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या104 व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे स्थानिक भक्तीधाम मंदिर समता नगर येथे आयोजन करण्यात आले होते .सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार हरीष भाऊ पिंपळे व मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून रीतसर शिबिरास सुरत करण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक विलास वानखडे यांनी केले . सर्वप्रथम महिला वर्गातील ओम शांती ओम ब्रह्मकुमारीजच्या मुक्ता दीदी व अंकिता खंडारे यांनी प्रथम रक्तदान करून खरी आदरांजलीअर्पण केली 41 वेळा रक्तदान करते समाजसेवक द्वारका भैय्या दुबे पोलीस कर्मचारी व होमगार्ड सैनिकांचा प्राण वाचवणारे जिगरबाज होमगार्ड सैनिक अक्षय ठाकरे संदीप सोनवणे राजेंद्र कुकलवार सह सर्वांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावले या शिबिरास आमदार हरिभाऊ पिंपळे कमलाकर भाऊ गावंडे कैलास भाऊ महाजन द्वारका भैया दुबे सत्यनारायणाची तिवारी इब्राहिम भाई घानीवाले रवि राठी अशोक थोरात परिमल कांबळे सुनील पवार अरविंद तायडे सुनील भोजगडीया पत्रकार प्रवीण ढगे मधुकरराव इंगोले महादेव इंगोले सुधाकरजी गौरखेडे उमाळे काका सो .मीना जवादे शेख रफिक भाई मिलिंद इंगळे महादेव पाटील सह कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक पत्रकार राजकीय पोलीस कर्मचारी होमगार्ड सैनिकांसह सर्वांनी भेटी देऊन रक्तदान केले सदर कार्यक्रमास सर्व समाजातील महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शविली दीपक खंडारे वैभव वानखडे दिनेश श्रीवास रवी माडकर निलेश वानखडे अवधूत थोरात दिगंबर सरदार विलास साळवे रणजीत शिरसाठ सह सर्वांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन नेहरू युवा बहुउद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी अध्यक्ष विलास वानखडे यांनी केले तर आभार श्री आई बाबा बहुद्देशीय संस्थेचे गजानन चव्हाण यांनी मानले.


हिरपूर ग्रामपंचायत चे वतीने साहित्यिक सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी हिरपूर ग्रामपंचायत कार्यालय येथे आज दिनांक१ जुलै २०२४ रोजी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान मातंग समाज भूषण साहित्यिक सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली त्याप्रसंगी हिरपूर ग्रामपंचायत सरपंच अमोल छत्रपती गढवे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून त्यांना अभिवादन केले आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य पूजा प्रमोद तायडे, यांनी समाज भूषण अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून त्यांना नमन केले व त्या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक यांनी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून थोर महापुरुषाला अभिवादन केले आहे वंदनीय समाजभूषण लोकशाहीर व साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कथा कादंबऱ्या व लोक कलेचा वारसा घेऊन समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचप्रमाणे त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहून समाजाच्या व्यथा प्रबोधनाद्वारे लोककलेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे आशा थोर महान मानवाला कोटी कोटी नमन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो असे नारे लावण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सचिव ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गढवे लक्ष्मणराव गावंडे ज्येष्ठ पत्रकार नागोरावजी तायडे मातंग समाज नेते गजानन तायडे ग्रामपंचायत कर्मचारी नितीन वसु ग्रामपंचायत कर्मचारी रियाजुद्दीन अरुण बोदळे प्रल्हादराव वाघमारे प्रमोद देविदास तायडे देविदासजी तायडे इत्यादी सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी 

हिरपूर येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक तिष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ .सुगतभाऊ वाघमारे , कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती बबनरावजी डाबेराव, हिरपूर तंटामुक्ती अध्यक्ष संजय राऊत, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समाजसेवक वासुदेव धुडदेव, गोपाल तायडे गजानन तायडे, प्रकाश तायडे , पत्रकार प्रविण ढगे,रमूभाई ,दिलीप देशमुख, मातंग समाज महिला आघाडी अध्यक्ष मनीषा तायडे, पूजा प्रमोद तायडे ग्रा.पं. सदस्य,पत्रकार नागोराव तायडे,
या सर्व पाहुण्यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व पाहुण्यांचे अण्णाभाऊ साठे युवा संघटना हिरपूर च्या कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य वक्ता गजानन तायडे व उद्योजक डॉक्टर सुगत भाऊ वाघमारे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपल्या लेखणीच्या द्वारे झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचे काम केले त्यांचे चरित्र वाचून आपण आपल्या प्रगतीचे दार उघडू शकतो असे विचार व्यक्त केले. 
याप्रसंगी रक्षाबंधनची भेट म्हणून तिष्णगत वेल्फेअर संस्थेच्या वतीने सुगत भाऊ वाघमारे व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळेस मीराबाई तायडे सोनाबाई वाघमारे छाया तायडे देविदास तायडे यांच्यासह असंख्य गावकरी कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरता गजानन तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रविण ढगे यांनी तर आभार प्रदर्शन गजानन मधुकर तायडे यांनी केले.



कार्यक्रमाचे उद्घाटक सुगत जी वाघमारे कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव डाबेराव प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार नागोरावजी तायडे समाजसेवक वासुदेव धुडदेव सुनील खंडारे सुरेश धुडदेव गोपाल गायकवाड मातंग समाज नेते गजानन मधुकर तायडे प्रकाश दांडगे प्रमुख पाहुणे रम्मु भाई प्रमुख उपस्थिती दिलीप देशमुख ज्येष्ठ पत्रकार प्रवीण ढगे राजेश घाटोळ मातंग समाजाच्यl महिला आघाडी अध्यक्ष l मनीषा ताई तायडे रेखा प्रल्हादराव वाघमारे मिराबाई देविदास तायडे गीता उमेश इंगळे सोनाबाई पुंजाराम वाघमारे छाया राजेश तायडे संजय राऊत उपस्थीत होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या