Ticker

6/recent/ticker-posts

चतुर्वण्या मनुवादी भाजपाचा असली चेहरा झाला उघड - डॉ प्रशांत पाटील वानखडे

चतुर्वण्या मनुवादी भाजपाचा असली चेहरा झाला उघड - डॉ प्रशांत पाटील वानखडे 


काँग्रेस ने आंदोलन करून केला निषेध 


अकोला जात व धर्माच्या आधारावर राजकारण करणे हाच भाजपाचा अजेंडा आहे. खा. राहुंल गांधी यांची जात विचारणारे लोक त्याच विचारसरणीचे आहेत, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारला, हे तेच लोक आहेत ज्यांनी आगरकर, महात्मा ज्योतिवा फुले, सावित्रिवाई फुले, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार, विठ्ठल रामजी शिंदे, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांच्या कार्यात विघ्न आणले. या महापुरुषांनी समाजातील वंचित, दलित, दुबळयांचा आक्रोश मांडला, त्या सर्वाना अपमान व टीकेला सामोरे जावे लागले. आज २१ व्या शतकातही ही मनुवादीवृत्ती डोके वर काढत आहे, तेच लोकसभेत भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी दाखवले आहे, तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर अनुराग ठाकूरच्या विधानाचे कौतुक केले, हे त्याहूनही गंभीर आहे. देशाच्या सर्वोच्य पदावर बसलेला व्यक्ती जात धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणाया विधानाचे समर्थन करतो हे या देशाचे दुर्दैव आहे. संविधानासमोर नतमस्तक होऊन शपथविधी घेणारा देशाचा पंतप्रधान खोटारड़ा आहे हे पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या वृत्तीतून दाखवून दिले आहे. या वृत्तीचा निषेध असल्याचे मत अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे यांनी व्यक्त केले.


सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात सामान न्याय व हक्क मिळावेत यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेची आहे. आणि ही मागणी कॉग्रेस पक्ष व इंडिया आघाडीतील मित्रपक्ष हे जातनिहाय जनगणना करण्यास कटीबद्ध आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचा जातनिहाय जनगणनेला तीव्र विरोध आहे.त्यांनी ही मागणी दुर्लक्षित करण्यासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी लोकसभेत मुद्दा मांडल्याने जातनिहाय जनगणनेचा चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूर यांनी खा. राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. हा अपमान देशातील संविधान प्रेमी जनता सहन करणार नाही खा. राहुल गांधी यांनी सामाजिक सुधारणेचे रणशिंग पुकारले आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही विरोध केला, शिव्या दिल्या,अडथळा आणला तरीही जातनिहाय जनगणना होणारच आहे.याच. मागणीसाठी आणि खास. राहुल गांधी यांचा लोकसभेत केलेल्या अपमानाचा अकोला महानगर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध केला आहे.


यावेळी अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे, प्रदेश सरचिटणीस प्रकाश तायडे, माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, जिल्हा ध्यक्ष अशोक अमानकर, माजी आमदार बबनराव चौधरी, प्रदेश सचिव मदन भरगड, प्रदेश महासचिव महेंद्र गवई, संजीवनी बिहाडे,, शहर अध्यक्ष पुष्पाताई देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष पूजा काळे, डॉ झिशान हुसैन, अनुजा शाह, तश्वर पटेल, आकाश कवडे, प्रकाश वाकोडे, राहुल सारवान, आलमगीर खान सह शेकडो काँग्रेस पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या