Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्याचा इतिहास कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन खा. अनुप धोत्रे

जिल्ह्याचा इतिहास कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन खा. अनुप धोत्रे


अकोला 
देशातील प्रत्येक नागरिक सुखी संपन्न व्हावा या भावनेने व मूलभूत सुविधा सोबत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा उंचावावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार एनडीए सरकार कार्यरत असून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील प्रत्येक घटक व प्रत्येक क्षेत्राचा भौगोलिक सामाजिक आर्थिक विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील असणारी महायुती सरकार पुन्हा स्थापनेच्या दृष्टीने व अकोला जिल्ह्याचा इतिहास कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन खासदार अनुप, धोत्रे यांनी केले. 


स्थानिक डॉक्टर बाबासाहेब टोपले सभागृह भारतीय जनता पार्टी कार्यालयात अकोला तालुका ग्रामीणच्या बै बैठकीत ते बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना व तालुका भाजपा अध्यक्ष देवेंद्र देवर हे होते तर मंचावर प्रमुख वक्ते डॉक्टर किशोर मालोकार हे होते तर डॉक्टर शंकरराव वाकोडे भाजपा सचिव अंबादास उमाळे माधव मानकर, एडवोकेटकल्पना पळसपगार विठ्ठल चतरकर शंकरराव महल्लेअकोला पंचायत समिती सभापती सुलभा सोळंके, विराजमान होते.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनेक योजनेचा लाभ सर्वसामान्य पर्यंत पोहोचून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन खासदार धोत्रे यांनी करून कार्यकर्त्यांच्या भावना समस्या जाणून घेतल्या. 
यावेळी डॉक्टर किशोर मालोकार यांनी बजेटच्या बारकावे व महत्त्व केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या चांगल्या कामाची माहिती घेऊन योजनेमधील लाभ सर्वसामान्य पर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवण्यासाठी कसे कार्य करावे व जलसंपर्कचा लाभ कसा होते याची अनेक टिप्स त्यांनी आपल्या भाषणात दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास उमाळे यांनी आभार प्रदर्शन शिवशंकर पाटील यांनी केले. 


भारतीय जनता पक्षाच्या वतीने अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी वरिष्ठांची चर्चा करून गिरीश जोशी, निकेश गुप्ता ,सिद्धार्थ शर्मा एडवोकेट देवाशिष काकड ,डॉक्टर किशोर मालोकार, आशिष चांद राणा, डॉक्टर अमित कावरे यांच्याकडे केंद्र आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाची माहिती कार्यकर्त्यांना व जे सांगून भूत रचना सोबत मतदार नोंदणी तसेच विविध विषयावर त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी जबाबदारी दिली त्या अनुषंगाने बाळापुर बार्शीटाकळी अकोला तालुका येथील बैठका होऊन सदस्य नोंदणी अभियानाला गती मिळाली आहे तसेच अर्थसंकल्पीय व केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेची माहिती कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य पोहोचण्याच्या अभियानाला गती मिळाली आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या