Ticker

6/recent/ticker-posts

नोंदनी विभागात आयुक्त यांना कम्प्युटर ऑपरेटर वाढवून देण्याची सुचना

नोंदनी विभागात आयुक्त यांना कम्प्युटर ऑपरेटर वाढवून देण्याची सुचना


 अकोला : जन्म,मृत्यू आणि विवाह नोंदणी गेल्या तीन महिन्यापासून नागरिकांना होत असलेल्या त्रासा बाबत. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी आयुक्त लहाने यांना कम्प्युटर ऑपरेटर वाढवून नागरिकांना त्रास होणार नाही तसेच प्रशिक्षण देऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या अशी निर्देश दिले. 
भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी व भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी माजी विरोधी पक्षनेते हरिभाऊ काळे यांनी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांना दाखल्या मिळवताना होणारा त्रासाबद्दल माहिती दिल्यावर ताबडतोब आमदार रणधीर सावरकर यांनी भ्रमणध्वनी आणि पत्रद्वारे आयुक्त लहानशी संपर्क साधून दिशा निर्देश दिले त्या अनुषंगाने महानगरपालिकेत चार ऑपरेटर ची नियुक्ती होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याची आदेश आयुक्त लहाने यांनी दिले आहे रजिस्टर व कर्मचाऱ्यांना बैठक घेऊन नागरिकांना होणारा त्रास संदर्भात दक्षता घेण्यात येईल असे अभिवचन आमदार रणधीर सावरकर यांना आयुक्त लहाने यांनी दिले आहे.


  सॉफ्टवेअर बदलल्यामुळे जन्म,मृत्यू आणि विवाह नोंदणी गेल्या तीन महिन्यापासून नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. नवीन सॉफ्टवेअर असल्यामुळे मनपा कर्मचारी यांना सदर सॉफ्टवेअर बाबत प्रशिक्षण कर्मचाऱ्याला दिले नाही. त्याच प्रमाणे संगणकांची कमतरता, सदर कामाकरता कर्मचाऱ्यांची कमी संख्या आदी कारणास्तव त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, दाखला देण्यासाठी तीन ते चार चार महिन्याची तारीख येत असून दलाल नागरिकांकडून भरमसाठ पैशाची मागणी करीत असल्याचे देखील माझे निदर्शनास आणण्यात आले.ही बाब अत्यंत गंभीर आहे असे आमदार सावरकर यांनी सांगून अकोले करांना त्रास होणार नाही याकडे लक्ष द्या असे बजावले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांना विविध दाखल्यांची आवश्यकता आहे.
 तरी या बाबत तातडीने कार्यवाही करून नागरिकांनी दाखले देण्याचीव्यवस्था करावी. त्या अनुषंगाने महानगरपालिका कर्मचारी कामाला लागले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या