बहिणीला पळून नेल्याच्या संशयावरून युवकास मारहाण
प्रतीनीधी- उद्धव कोकणे.
माना
बहिणीला पळवून नेल्याच्या संशयावरून फिर्यादी प्रेम धम्मपाल पुरे वय 20 वर्ष राहणार कवठा सोपीनाथ या युवकाला दोघांनी मिळून माना फाटा येथे मारहाण केल्याची घटना माना पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रेम धम्मपाल कुरे वय वीस वर्षे राहणार कवठा सोपीनाथ यांचे आरोपी सागर शिवा गोरे राहणार राजापूर खिनखिणी व भीमा भगत राहणार कवठा सोपीनाथ यांच्या बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याचा संशय सागर गोरे व भीमा भगत यांना होता या संशयावरून आरोपी सागर शिवा गोरे व भीमा भगत यांनी मिळून प्रेम धम्मपाल पुरे हा मान्यावरून कवट्याकडे जात असताना सागर शिवा गोरे व भीमा भगत या दोघांनी माना फाटा येथे अडवून माझ्या बहिणीला तू प्रेम जाळ्यात फसवून का घेऊन गेला असे म्हणत त्यांनी दोघांनी प्रेम धम्मपाल कुरे याला बेदम मारहाण केली.
तेथील काही लोकात लोकांच्या मध्यस्थीने प्रेम धम्मपाल कुरे हा माना पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी सागर शिवा गोरे व भीमा भगत या दोघांनी विरुद्ध तक्रार दाखल केली असून माना पोलिसांनी कलम 118 एक शे पंधरा दोन व 352 तीन नुसार भारतीय न्याय संहिता कलमांद्वारे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरत सुरोशे यांचे मार्गदर्शनाखाली वैजनाथ धुळे हे करीत आहेत
0 टिप्पण्या