अकोला येथील समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृहात प्रवेश अर्ज सुरु..
सामाजिक न्याय विभाग अंतर्गत मुला-मुलींसाठी वस्तीगृह चालवली जात आहेत.
मागासवर्गीयांची शैक्षणिक सामाजिक आर्थिक उन्नती व्हावी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता शासकीय वस्तीगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह अकोला या वस्तीगृहात येता आठवी ते पदवी पर्यंतची वस्तीगृह प्रवेश अर्ज वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे. गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार वस्तीगृहामध्ये प्रवेश देणे सुरू आहे.
अकोला रहिवासी नसलेले परंतु अकोला महानगरपालिका हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या अभ्यासू होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अर्ज करावे असे आवाहन गृहपाल श्रीमती ए.पी.चेडे यांनी केले आहे..
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या