Ticker

6/recent/ticker-posts

छत्तीसगड येथील युवकाचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू, खिशातील आधार व ओळखपत्राने ओळख पटली

छत्तीसगड येथील युवकाचा रेल्वेतून पडून जागीच मृत्यू, खिशातील आधार व ओळखपत्राने ओळख पटली


प्रतीनीधी-  उद्धव कोकणे
माना
माना सेक्शन मधील मुर्तीजापुर ते माना चे मधोमध रेल्वेतून पडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आठ जुलै रोजी दीड वाजताच्या सुमारास माना सेक्शन मध्ये घडली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी चाबी वाले वसंत राहुल दौंड वय 37 वर्ष राहणार माना तालुका मुर्तीजापुर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक आठ जुलै 1.30 वा सुमारास एका अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची रिपोर्ट माना पोलीस स्टेशनला येऊन दिले.



यावरून माना पोलिसांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तातडीने घटनास्थळी जाऊन सेक्शन नंबर 632 ऑब्लिक 12 प्लस 14 तेथील पंचनामा करून मृतकाच्या खिशात एक आधार कार्ड, ओळखपत्र, व रेल्वेचे तिकीट, व आपला मोबाईल मृतकाच्या खिशात सापडला. यावरून माना पोलिसांनी तपास लावून मृतात हा रायगड जिल्ह्यातील राहणार चालला छत्तीसगड येथील रहिवासी असून त्याचे नाव डॅनियल बिरसा निंज असून त्याची ओळख पटली आहे. माना पोलिसांनी मर्ग नंबर 15/24 कलम 174 बी एन डबल एस नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार सुरज सुरवसे यांचे मार्गदर्शनाखाली वैजनाथ धुळे हे करीत आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या