भारत मातेच्या वीर सुपुत्राला भाजपाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
अकोला _मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील किन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले. आज दि ९/७/२०२४ रोजी मोरगाव भाकरे येथील वीर जवान प्रवीण जंजाळ यांचे निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ अशोक ओळंबे हरीश अलीमचंदानी आशिष पवित्रकार यांनी सांत्वना भेट देऊन आयोजित प्रार्थनेमध्ये भाग घेतला यावेळी संपूर्ण गावातील व परिसरातील नागरिक प्रार्थनेला उपस्थित होते जंजाळ परिवार व नातेवाईक यांच्या वतीने प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.भाजपा ओबिसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ अशोक ओळंबे नगरसेवक हरीश अलीमचंदानी नगरसेवक आशिष पवित्रकार गौरव पाटील यांनी वीर पुत्र प्रवीण प्रभाकर जंजाळ यांचे निवासस्थानी उपस्थित राहून जंजाळ परिवाराचे सांत्वन केले याप्रसंगी माजी सैनिक व नागरिकांनी शासनजमा असलेल्या उपलब्ध E_ क्लास जमिनीतील ७० आर जमीन ही शहीद प्रवीण जंजाळ यांचे स्मारक उभारण्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शासनाकडे केल्याची माहिती दिली. मोरगाव भाकरे गाव हे सर्वसाधारण गाव नसून या गावात जवळपास ९० चे वर युवक व माजी सैनिक राहात असून देश रक्षणाचे कार्य करीत असल्याचे सांगितले त्यांचा सन्मान व्हावा यासाठी मोरगाव भाकरे येथे शाहिद प्रवीण जंजाळ स्मारक व इतर सैनिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता भारतीय जनता पार्टी शहीद प्रवीण जंजाळ परिवार व गावकऱ्यांसोबत असल्याचे डॉ अशोक ओळंबे यांनी सांगितले यावेळी शहीद वीर जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना भाजपा अकोला जिल्हा व महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
0 टिप्पण्या