Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा अकोला मध्ये बोरगांव मंजु येथील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

भाजपा अकोला मध्ये बोरगांव मंजु येथील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश


 खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार अनुपभाऊ धोत्रे आमदार वसंतभाऊ खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, विजयभाऊ अग्रवाल यांच्या उपस्थितीमध्ये बोरगांव मंजु येथील सुबोधभाऊ गवई यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला.
   यावेळी माधव मानकर, संजय गोटफोडे, देवेंद्र देवर, मनिराम ताले, सागर तायडे, धनजंय गवई, बाळू देशमुख, अजय हिवाळे, गौतम बागडे, राजू अस्वार, निलेश कटाळे, संजय गवई, योगेश बागडे, सुधीर वानखेडे, साहेब बागडे लक्ष्मण इंगळे प्रदीप अंभोरे, सुनील लाधे सचिन दंदी अक्षय दंदी विश्र्वदिप दंदी सागर खडे अनिकेत गवई कुणाल कांबळे राजेश अंभोरे मनोज बागडे विलास गवळी आकाश इंगळे सागर वानखडे, विशाल इंगळे राजू खंडारे चेतन तायडे दिपक जाधव संदीप गावंडे सर्वेश वर्मा राज लांजेवार अजय शिरसाट आदी पदाधिकारी उपस्थित होते.


स्थानिक मनु ताई कन्या शाळेत शिक्षण सप्ताहाच्या अनुषंगाने ई -
कचरा जागरूकता व संकलन अभियान व कलाकारागिरीचे प्रदर्शन

शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 जुलै ते 28 जुलै या कालावधीत स्थानिक मनु ताई कन्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस. क्रीडा दिवस, कौशल्य व डिजिटल दिवस पायाभूत, साक्षरता आणि संख्याज्ञान दिवस, तसेच मिशन लाईफच्या दृष्टिकोनातून इको क्लब स्थापन करण्यात आला, व त्यादिवशी ई कचरा जागरूकता व संकलन अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थिनींनी व शाळेतील सर्वांनी ई-कचरा गोळा केला. आपल्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शिक्षण सप्ताहाचा एक भाग असणाऱ्या सांस्कृतिक दिनासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थिनींनी कला कारागिरीचे प्रदर्शन भरून बारा बलुतेदारी पद्धतीचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा सौ. पल्लवीताई कुलकर्णी मॅडम तसेच संस्थेचे सल्लागार श्री अनिरुद्ध चौधरी सर श्री शांडिल्य सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ऐश्वर्या ताई धारस्कर मॅडम पर्यवेक्षिका श्रीमती मांगे मॅडम. यांच्या हस्ते करण्यात आले. बारा व्यवसायांचे व कलेचे दर्शन घडवून विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर रित्या सर्व कलेचे प्रात्यक्षिक दाखवून समाजासमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या अध्यक्षा सौ. पल्लवी ताई कुळकर्णी मॅडम यांनी विद्यार्थिनी स्वावलंबी व्हाव्या या दृष्टिकोनातून काही कला शाळेमध्ये प्रत्यक्षरीत्या सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. समाजामधील गोंधळी कला गोंधळाचे सुंदररित्या सादरीकरण करून तसेच कुंभार कला मातीच्या विविध वस्तू बनवून व मातंग समाजातील कला बांबू पासून वस्तू कशा बनवितात याचे प्रात्यक्षिक त्या त्या समाजातील लोकांना आमंत्रित करून त्यांच्याद्वारे दाखविण्यात आले. संस्थेतर्फे व शाळेतर्फे या समाजातील कलेचा सत्कार करण्यात आला .अकोला जिल्ह्याचे गटशिक्षणाधिकारी श्री श्याम राऊत साहेब तसेच केंद्रप्रमुख श्री सुरेश सर यांनी ई-कचरा जागरूकता व संकलन अभियान या उपक्रमाला भेट देऊन कला व कारागिरीच्या प्रदर्शनी ची पाहणी करून विद्यार्थिनींना प्रोत्साहन दिले व विद्यार्थिनींचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.रोहिणी बोंबटकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाकरिता शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ऐश्वर्या ताई धारस्कर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शाळेमध्ये विद्यार्थीनी व शिक्षकांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शिक्षण सप्ताहातील संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या