उपसभापतीवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते धडकले ठाण्यात
प्रतिनिधी नासीर शेख
शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या मुख्याध्यापकास संविधानिक मार्गाने विचारणा करणाऱ्या लोकप्रतिनिधी उपसभापती इमरान खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल होणे ही गंभीर बाब आहे. याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध करण्यात आला, उपसभापती यांच्यावर झालेले खोटे गुन्हे रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पातुर तालुका अध्यक्ष चंद्रकांत तायडे यांच्या नेतृत्वात शनिवारी चान्नी पोलीस स्टेशन मार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी बाळापुर, व पोलीस अधीक्षक अकोला यांना निवेदन देण्यात आले वरील गुन्हे जर मागे घेण्यात आले नाही. तर वंचित बहुजन आघाडी पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य जनमोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी चंद्रकांत तायडे युवा आघाडी अध्यक्ष, अर्चनाताई डाबेराव म.आ. अध्यक्ष, राजेश सरकटे भा. बौ. म. तालुका अध्यक्ष, विनोदभाऊ देशमुख जि प सदस्य, अर्जुनभाऊ टप्पे सभापतीपती, चरणसिंग चव्हाण संचालक कृ उ बा स,मंगेश गोळे तालुका महासचिव, सुनील बंड युवा महासचिव, मंगेश देशमुख युवा महासचिव, राष्ट्रपाल गवई संचालक कृ उ बा समिती, मो. जैद शहर अध्यक्ष,ज्येष्ठ नेते अरविंद महल्ले, नुर खान सर, मनोज गवई ता.उपाध्यक्ष, रामदास बर्डे ता उपाध्यक्ष, पवन बर्डे ता उपाध्यक्ष, मनोहर बेलोकर,राणा डाबेराव, मोहन सोनोने सरपंच, धम्मदीप इंगळे, गोपाल खंडारे शरद ताजने ता युवा उपाध्यक्ष किशोर घोगरे युवा उपाध्यक्ष, विकास कीर्तने, अमोल डीवरे, दुर्गाताई अवचार ,स्वाती उगले, सुनिताताई ठाकरे, वर्षा अंभोरे, स्मिता सोनोने, अरुणा अंभोरे, लता उपरवट, वर्षाताई सदार, विद्याताई धाडसे , सूर्यकांता ताले उपसरपंच चान्नी, ज्ञानेश्वर बुंदे गण अध्यक्ष, प्रकाश गवई, विनोद चिपडे, गजानन भुरकाडे व तालुका भरातून आलेले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या