Ticker

6/recent/ticker-posts

केळीवेळी ग्रामस्थांच्या स्व. आढे विदर्भ भूषण पुरस्काराचे वितरण दोनदिवसीय भव्य जन्मशताब्दी सोहळ्यात संपूर्ण गावकऱ्यांचा सहभाग

केळीवेळी ग्रामस्थांच्या स्व. आढे विदर्भ भूषण पुरस्काराचे वितरण दोनदिवसीय भव्य जन्मशताब्दी सोहळ्यात संपूर्ण गावकऱ्यांचा सहभाग


----------------------------------------
प्रा. भारसाकळेंनी समाजसेवा पर्वाची पूर्तता केली- आचार्य हरिभाऊ वेरुळकर 
---------------------------------------- 


केळीवेळी: तालुक्यातील कबड्डी या खेळाची पंढरी म्हणून सर्व देशात प्रसिद्ध असणाऱ्या केळीवेळी या ग्रामस्थळावर प्रभावी तथा वृद्धिंगत समाजसेवेचे सातत्य व कार्यपूर्तता साधणाऱ्या तथा समाजसेवेचे अखंड व्रत अंगिकारणाऱ्या व्यक्तीस सुप्रसिद्ध समाजसेवी स्व . रामकृष्ण उपाख्य जानरावजी आढे या स्वातंत्र्य सेनानी व्यक्तीमत्वाच्या स्मृती विदर्भ भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते . यावर्षी संपन्न झालेल्या जन्मशताब्दी वर्ष महोत्सवात दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष तथा दर्यापूर तालुक्यातील माहुली ( धांडे ) परिसातील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक - संचालक प्रा. गजानन रामकृष्ण भारसाकळे यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महोत्सव मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमास स्व. आढे यांच्या भूदान , ग्रामदान तसेच कबड्डी या खेळाच्या उत्थापनेसाठी कार्य काळातील जीवन कार्य संपर्कांत आलेल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित जेष्ठ पुरुष - महिला मान्यवरांच्या गौरवासह स्व आढे यांच्या सेवेची ज्योत तेवत ठेवणाऱ्या व केळीवेळी गावाच्या उत्कर्षासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या मोठ्या संस्थेने उपस्थित सर्वांच्या उपस्थितीत गावातील कर्तृत्वसंपन्न व्यक्तींचा सुद्धा या निमित्ताने जन्मशताब्दी महोत्सव स्मृती चिन्हासह यथोचित सन्मान करण्यात आला . 


प्रा गजानन भारसाकळे यांनी पुरस्काराचे सन्मानपत्र - शाल श्रीफळ स्विकारतांना पुरस्काराची रु. ५०००/- ची रक्कम आयोजन समितीस याच कार्यासाठी परत केली तेव्हा सभागृह अतीशय भावूक झाले होते*. प्रा. गजानन भारसाकळे यांनी या प्रसंगी बोलतांना आपण केळीवेळी गावात पस्तीस किलोमीटर सायकलने प्रवास करून कबड्डी स्पर्धेत सहभागी होत होतो तसेच या गावातील मुले - मुली हे मी प्राध्यापक असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभूळगांव - अकोला येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी असल्याबद्दल आनंदही व्यक्त केला . संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे समाजसेवा व पर्यावरण हे दोन्ही क्षेत्रातील पुरस्कार एकत्रित मिळविण्याची आपल्या नावे नोंद रकरणारे प्रा . गजानन भारसाकळे यांच्या गौरवात या विदर्भ भूषण पुरस्काराने भर पडल्याबाबत त्यांच्या सर्व सहकारी व चाहत्या वर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे .या सोहळ्याच्या मंचावर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून सर्वसेवा संघ व नई तालीम सेवाग्राम संस्थेचे अध्यक्ष डॉ सुगन बरंठ , सेवाग्राम येथील जेष्ठ गांधी विचारक डॉ उल्हास जाजू , माजी आमदार गजानन दाळू गुरुजी व नागपूर येथील भूदान यज्ञ मंडळाचे सचिव एकनाथ डगवार यांची आस्थिती होती . कार्यक्रमा दरम्यान डॉ राजकुमार बुले , मुकुंदराव बकाल , रमेश दाणे , डॉ जगतानंद भटकर व बबनराव कानकिरड या सर्व सेवाधारी मंडळींना आपआपल्या क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबाबत अतिथींच्या शुभहस्ते विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.


या अतीशय नियोजन बद्द दोन दिवसीय महोत्सव आयोजनाची जबाबदारी केळीवेळी ग्राम मंडळाचे अध्यक्ष किशोर बुले यांनी आपले जेष्ठ मार्गदर्शक डॉ महेंद्रसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनात तसेच पुरुषोत्तम नळे , संतोषराव शिवरकार , विठ्ठलराव हिवरे , प्रशांत आढे , निरंजन बोर्डे , महेश आढे , सौ. नंदाताई भारसाकळे , बबनराव कानकिरड , डॉ मिलींद निवाणे , श्रीमती प्रभाताई आढे , नितीन भरणे, कृष्णराव भरणे , डॉ किशोर पालडीवाल , माधवराव बकाल, अमोल चिलात्रे , नजीर शहा आमद शहा, निळकंठ खेडकर, गुरुचरणसिंह यदु ठाकूर , वासुदेव साटोटे , रत्नदिप थोरात , सुनिल अवचार , अक्षय जहुरकर या मान्यवरांच्या सहकार्याने तसेच केळीवेळी येथील श्री सखाराम महाराज शिक्षण प्रगती मंडळ , श्री हनुमान क्रीडा मंडळ , आदर्श ग्रामवाचनालय , सर्वोदय मित्र परिवार व श्री सखाराम महाराज विद्यालय इत्यादी संस्था यांना विश्वासात घेऊन संपूर्ण गावकरी मंडळीसह पार पाडली . कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन , प्रास्ताविक व आभार प्रदर्शनासह डॉ महेंद्रसिंह ठाकूर यांनी केले .



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या