Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल- खा.अशोक चव्हाण

भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल- खा.अशोक चव्हाण


अकोला 
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाला सुजलाम सुफलाम करण्याच्या दृष्टीने वाटचाल सर्व असून महाराष्ट्र देशातील एक नंबरचे सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतिशील राज्य म्हणून काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात विकास गतिशील होत असून आगामी विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल असा विश्वास माजी मुख्यमंत्री भाजप नेते खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. 


दर्यापूर येथे खाजगी कार्यक्रमात जात असताना माजी खासदार संजय धोत्रे खासदार अनुप धोत्रे प्रदेश भारतीय जनता पक्ष सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकले, आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील विजय अग्रवाल जयंत मसने यांच्या नेतृत्वात त्यांचा स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.


महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती, देशाची राजकीय परिस्थिती विचाराने व कामाला कामाने विकासाच्या कामाला विरोध करू शकत नाही त्यामुळे जाती जाती धर्माधर्मामध्ये तसेच अफवा पसरून सतत खोटे बोलून अपप्रचार करण्याचा ठेका उद्धवसेना व काँग्रेस सुळे राष्ट्रवादी गटाने केला आहे यापासून सावध राहण्याची गरज आहे मुख्यमंत्री माजी लाली बहीण ही योजना समाजाच्या सर्व घटकासाठी असताना ही योजनेचा लाभ मिळू शकणार नाही असा अपप्रचार करून सर्वसामान्यांना वंचित ठेवण्याचे काम महाविकास आघाडी करून सुरू असल्याचा आरोप खासदार चव्हाण यांनी केला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता शिस्त आणि विचारांची बांधिलकी असून जनसंपर्क तीन महिने महत्त्वाची असून जनतेशी संपर्क ठेवून 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीचे नेत्यांनी मुंबई येथे केला आहे याला पूर्ण करण्यासाठी कामाला लागा अशीही यावेळी खासदार चव्हाण म्हणाले. 
विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली माधव मानकर, डॉक्टर किशोर मालोकार , गिरीश जोशी, पवन महल्ले ,संजय गोट फोडे, एडवोकेट देवाशिष काकड ,संदीप गावंडे ,संतोष पांडे, दिलीप मिश्रा संजय जोशी, विकी ठाकूर रमेश करिहार, गणेश अंधारे वैभव मेहरे सागर तिवारी अभिषेक भगत, मनोज शाहू, यश सेकि, सरीया यश अग्रवाल, प्रशांत अग्रवाल प्रशांत प्रशांत अवचार, आशिष चांद राणा, सिद्धार्थ शर्मा, निलेश निनोरे, अजय भारसाकले विठ्ठल देशमुख, आधी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी अकोला जिल्हा भाजपाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी प्रास्ताविक विजय अग्रवाल तर आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले,


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या