Ticker

6/recent/ticker-posts

नदीत नवजात शिशुचा मृतदेह आढळला, पातूर बाळापुर मार्गावरील घटना

नदीत नवजात शिशुचा मृतदेह आढळलापातूर बाळापुर मार्गावरील घटना


प्रतिनिधी नासीर शेख
पातूर :अकोला जिल्ह्यातील पातुर बाळापूर मार्गावरील पातुर जवळ नदीत नवजात शिशुचा मृतदेह आढळून आल्याची घटना २० जून रोजीच्या दुपारी उघडकीस आल्याने पातूर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खडबड उडाली आहे.२० जून रोजी दुपारी नदीच्या काठावर काही मुले खेळत असताना नदीच्या पाण्यात नवजात शिशुचा मृतदेह तरंगताना आढळून आला, सदर घटनेची माहिती मिळताच पातुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नवजात शिशुचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले,नवजात शिशू तीन ते चार दिवसांचा असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. नवजात शिशुचा मृतदेह कुणी  टाकला असावा? याच्यामागे काय उद्देश आहे, हे अद्यापही स्पष्ट झाला नाही,या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.




बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या