Ticker

6/recent/ticker-posts

महान - अकोला रस्त्यावर दोन दुचाकीचा भीषण अपघात, एक जण ठार तर दोन जण गंभीर

महान - अकोला रस्त्यावर दोन दुचाकीचा  भीषण अपघात, एक जण ठार तर दोन जण गंभीर 


 
 प्रतिनिधी- निलेश इंगळे 
बार्शीटाकळी:
महानपासून अवघ्या ४ किमी. अंतरावरील टिटवन फाट्यासमोरील पाण्याच्या टाकी जवळ १९ जून रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच दुखद मुत्यू  झाला, तर दोनजण गंभीर जखमी आहेत. मुत्यू व्यक्तीचे नाव अनिल गुलाबराव नानोटे वय ४५ वर्ष अंदाजे आहे ते ग्रामपंचायत निंभारा येथील कर्मचारी असुन दुचाकी क्रमांक एम. एच. ३० एपी ९३८६ ने बार्शीटाकळीवरून निंभाराकडे येत होते, तर महानवरून टिटवनकडे विशाल शिंदे वय २४ व पुरुषोत्तम पांडे वय ३२ हे दुचाकी क्रमांक एम. एच. ३० बीएन १५४५ ने टिटवन येथील जात होते. टिटवन फाट्यासमोरील पाण्याच्या टाकीजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात निंभोरा येथील अनिल गुलाबराव नानोटे (वय ४४) यांचा जागीच मृत्यू झाला, तर टिटवण येथील विशाल बबन शिंदे (वय २३), पुरुषोत्तम श्रीपत पांडे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले झाले आहेत. दोघानाही अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यामध्ये विशाल शिंदे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या