ब्रेकिंग- धरणातील 55 फुट खोल पाण्यातुन युवकाचा मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या टीम शोधून काढला
येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरुळपीर येथील जवानांची साहसी कार्यवाही
🏊♀️ मिळालेल्या माहितीनुसार मंगरुळपीर जि.वाशिम येथील मोहम्मद हुजेफ मो. रियाज्जुद्दीन वय अंदाजे 12 वर्ष रा.वॉर्ड नंबर 05 चहल पुरा मंगरूळपीर हा ईद निमित्त चारपाच मित्रासह पोहण्यासाठी आला होता यापैकी धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला असल्याची माहीती मंगरूळपीर तहसीलदार शितल बंडगर मॅडम यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले तेव्हा लगेच दीपक सदाफळे यांनी आपले मंगरुळपीर शाखेचे अतुल ऊमाळे,गोपाल गीरे,लखन खोडे,मुन्ना मूंदे,रोहन डोंगरे, सिधु इंगोले,शिवा आडात, यांना घटनास्थळी रवाना केले आणी सर्च ऑपरेशन चालु करण्याचे सांगीतले तेव्हा अशी खात्री झाली की धरणातील गाळ काढल्यामुळे यावर्षी धरणात 50 ते 60 फुट पाणी असल्याचे सरपंच यांचे कडुन निष्पन्न झाले नंतर पिंजर वरुन रेस्क्यु बोट स्कुबाडायविंग कीटसह रेस्क्यु टीम एका तासात घटनास्थळावर पोहचली पुन्हा सर्च ऑपरेशन चालु करणार तेव्हढ्यात पथकातील अतुल उमाळे यांच्या गळाला मृतदेह लागला. यावेळी घटनास्थळावर तहसीलदार शितल बंडगर मॅडम, आसेगाव तसेच मंगरुळपीर ठाणेदार सह पोलीस कर्मचारी आणी दस्तापुर पुरचे सरपंच मुकेश मुंजे आणी मंगरूळपीर येथील नातेवाईक मोठ्याप्रमाणात हजर होते यासह उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव सर आणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.
0 टिप्पण्या