गुलामनबी आझाद महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
प्रतिनिधी - निलेश इंगळे
बार्शीटाकळी
स्थानीक गुलाम नबी आझाद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी जि अकोला येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 जून रोजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. प्रथमतः सर्व विद्यार्थि महाविद्यालयाचे प्रांगणात एका रांगेत उभे राहून विविध प्रकारचे योगासने करण्यात व्यस्त असतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी पी आगाशे महत्त्वाच्या सुचना देत होते.
डॉ आगाशे यांनी "मानवी जीवनात योगाचे महत्त्व" या विषयावर विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर योग प्रशिक्षण वर्गाला सुरुवात झाली. योग प्रशिक्षणामध्ये विविध प्रकारच्या पद्धती सांगण्यात आल्या. प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आदी विषयांवर त्यांनी सर्वाना माहिती दिली. सोबतच विविध प्रकारचे आसने जसे शवासन, पद्मासन, दुर्वासासन व तत्सम आसनावर त्यांनी प्रकाश टाकला. सर्व विद्यार्थ्यांना, प्राध्यापक व कर्मचारी यांना योगाचे नियम व प्रत्यक्ष प्राणायाम व योगा करून घेतला. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉ व्हि एस उंडाळ यांनी मानले. या संपूर्ण योग कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ व्हि एस उंडाळ, डॉ व्ही बी कौटंबे सोबतच प्रा. गायकवाड, प्रा जयवाल , अंकुश मोहोड, प्रीया जामनीक यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या