Ticker

6/recent/ticker-posts

शनिवार रात्री बरसला पाऊस,आजच्या पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आले बदल

शनिवार रात्री बरसला पाऊस,आजच्या पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आले बदल

अकोला
अकोला पोलीस घटकात १९५ पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया ही दिनांक १९ जुन २४ पासुन सुरु असुन आज दिनांक २२ जुन २४ रोजी एकुण १००० उमेदवारांना भरती प्रक्रीया साठी बोलविण्यात आले आहे. काल रात्री व आज सकाळी झालेल्या पाऊसामुळे पोलीस मुख्यालय येथिल मैदान तसेच वसंत देसाई स्टेडीयम येथिल मैदानावर शारीरीक चाचणी ही घेता येणार नाही. अकोला घटकातील पोलीस भरती साठीचे वेळापत्रक हे ठरलेले असुन त्यानुसार भरती प्रक्रीया दिनांक ०८ जुलै २४ पर्यत आहे. आज रोजीच्या उमेदवाराना शारीरीक चाचणी साठी दिनांक ०९ जुलै २०२४ रोजीची तारीख देण्यात येत आहे.


आज रोजी आलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच उंची व छातीचे मोजमाप घेण्यात येणार आहे. आज जे उमेदवार पाऊसामुळे भरती प्रक्रीया साठी उपस्थित राहु शकले नाहीत त्यांची कागदपत्र पडताळणी, उंची व छाती मोजमाप व शारीरीक चाचणीची संपुर्ण प्रक्रीया ही दिनांक ०९ जुलै २४ रोजी घेण्यात येणार आहे.


आज रोजी सकाळी आलेल्या पाऊसामुळे सर्व उमेदवारांची तात्पुरती थांबण्याची व्यवस्था राणी महल पोलीस लॉन येथे करण्यात आली होती. सदर उमेदवाराना पोलीस मोटार परीवहन विभागाचे वाहनामधुन पोलीस मुख्यालय येथुन राणी महल येथे तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या