विरोधक अपप्रचारात गुंतले....सरकारने जनहित जपले, लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा
आमदार रणधीर सावरकर यांचे आवाहन
तमाम माता भगिनीच्या आर्थिक संरक्षनार्थ व त्यांना आदर पूर्वक समर्पित असलेल्या लाडकी बहीण या योजनेचा अकोला जिल्ह्यातील समस्त माता भगिनिंनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अकोला पुर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.
राज्यातील विरोधी पक्ष हा राज्य सरकारच्या विरोधात खोटा अपप्रचार करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र हताश झालेल्या विरोधकांच्या या अशोभनीय कृतीकडे अजिबात लक्ष न देता जनतेच्या हितासाठी काम करण्याला "महायुतीच्या" सरकारने अधिक महत्व दिले आहे असे मत आमदार सावरकर यांनी व्यक्त केले. राज्यातील " महायुती" सरकारच्या वतीने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकप्लामधे अनेक जनहिताच्या योजनांचा समावेश केला आहे. त्यात विशेषतः राज्यातील मातृशक्तीला विशेष दर्जा देवून त्यांच्या आर्थिक बळकटी करणाची काळजि घेण्यात आली आहे. त्यांच्या सन्मानार्थ लाडकी बहिण ही योजना अमलात आणली आहे.
वाचा पात्रता आणी अपात्रता... 👇 लागणारी कागदपत्रे
या योजनेमुळे समस्त माता भगिनींना मोठ्या प्रमानात आर्थिक मदतीचा हाथ पुढे करत दर महिन्याला 1500 रुपये एवढी रक्कम थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याची राज्य शासनाने घेतला आहे. या स्तुत्य योजनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याकरिता या कल्याणकारी योजनेचा माता भगिनींनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या