Ticker

6/recent/ticker-posts

पोलिस पाटील 'एसीबी'च्या जाळ्यात; ग्राम सचिव फरार, गुन्हा दाखल

पोलिस पाटील 'एसीबी' च्या जाळ्यात; ग्राम सचिव फरार, गुन्हा दाखल


अकोला
ग्राम यावलखेड येथील पोलीस पाटील हरिदास प्रधान व ग्रामपंचायत सचिव मनोरमा पोरे यांनी हॉटेल बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी असलेले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्याकरिता एक लाख वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो अकोला यांना प्राप्त झाली होती. हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे देण्यासाठी ग्राम यावलखेड येथील पोलीस पाटील हरिदास प्रधान वय ५३, रा. यावलखेड, ता. जि. अकोला व ग्रामपंचायत सचिव मनोरमा पोरे वय ५५, सचिव ग्रामपंचायत कार्यालय, यावलखेड, रा. कौलखेड, अकोला अशी आरोपींची नावे असुन यांनी एक लाख वीस हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार २० जून रोजी करण्यात आली होती. त्यानुसार अँटी करप्शन ब्युरो यांनी लाच मागणी पडताळणी केली असता पंचासमक्ष तक्रारदाराने पोलीस पाटील हरिदास प्रधान यांनी एक लाख वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे तसेच ग्रामपंचायत कार्यालय सचिव मनोरमा पोरे यांनी लाच मागणीस समर्थन देऊन लाच मागणीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आरोपी प्रधान व पोरे यांना संशय आल्यानंतर त्यांनी भेटण्यास टाळाटाळ करून मागणी केलेली लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारण्यास नकार दिला. मात्र याबाबत खात्री पटल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन बोरगाव मंजु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन सावंत, पोलिस निरीक्षक नरेंद्र खैरनार, अंमलदार डिगांबर जाधव, प्रदीप गावंडे, संदीप ताले, किशोर पवार, नीलेश शेगोकार, श्रीकृष्ण पळसपगार, सुनील येलोने यांनी केली.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या