Ticker

6/recent/ticker-posts

अंबादेवी संस्थान डोंगरगाव येथे आदर्श बाल सुसंस्कार शिबिर.

अंबादेवी संस्थान डोंगरगाव येथे आदर्श बाल सुसंस्कार शिबिर.


प्रतीनीधी- राहुल खाडे
अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथे माता अंबादेवी संस्थान या ठिकाणी आदर्श बाल सुसंस्कार शिबिर पासून 1 मे पासुन सुरु. हे शिबिर एकूण विस दिवसांचे असून शिबिरामध्ये सर्व मुलांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या मनावर वैदिक सनातन हिंदू संस्कृतीचे अत्यंत महत्त्वाचे असुन व संस्कृतीचे जतन होण्यासाठी व धर्माचे रक्षण होण्यासाठी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन डोंगरगाव येथे 1 मे पासुन सुरु असुन या शिबिरामध्ये मुलां-मुलींना प्रार्थना, योगासने, टाळ मृदुंग, गायन श्रीमद् भागवत गीता अ 15 वा संस्कृत गीता श्लोक हरिपाठ ज्ञानेश्वरी ओव्या पावल्या, शिवकालीन गुप्त भाषा, वकृत्व, संत तुकाराम गाथा अभंग, संतांचे चरित्र हिंदू संस्कृती व वैदिक हिंदू संस्कृतीचे धडे मुलांना दिले जात आहे. सदर शिबिरामध्ये बाहेर जाऊन आलेल्या अनेक मुलांचा सहभाग आहे. सदर शिबिरामध्ये संजय महाराज पाचपोहे यांनी स्वतः येऊन मुलांना मार्गदर्शन केले व हिंदू धर्म हिंदू धर्माच्या संस्कृतीचे पालन करण्याचे संतांची विचार आचरणात आणण्याचे मुलांना सांगत होते. त्याचप्रमाणे या बाल सुसंस्कार शिबिराला अनेक संतांनी भेटी दिल्या असे उमेश महाराज साबळे यांनी सांगितले.


 त्याचप्रमाणे रविवार रोजी झालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये विशेष उपस्थिती ह.भ.प.श्री रामकृष्ण महाराज पाचपोहे श्री ह.म.प सतीश महाराज खराटे, ह.भ.प विठ्ठल महाराज महल्ले, ह.भ. प. गणेश महाराज इंगळे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज खराटे ह.भ.प विनोद महाराज नटकुट बोलत होते व त्यावेळी ह.भ.प. उमेश साबळे महाराज त्याप्रसंगी सुध्दा बोलत होते. सदर शिबिरामध्ये मुलं व मुली मिळून 50 ते 60 मुलं मुली,बालक या सुसंस्कार

या शिबिराचे धडे घेत आहेत. याप्रसंगी डोंगरगाव येथे प्रमुख व विशेष उपस्थित म्हणुन ह.भ.प. रामकृष्ण महाराज पाचपोहे,ह.भ.प उमेश महाराज साबळे,सतीश खराटे महाराज,रामकृष्ण पाचपोहे महाराज, ज्ञानेश्वर खराटे महाराज, विठ्ठल महल्ले महाराज lआदी होते.तर शुभम देशमुख विनोद नटखट महाराज व समस्त गावकरी मंडळींनी व तरुण मंडळी आदींनी परिश्रम घेऊन मुलांना आदर्श विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या