खदान पोलिस स्टेशन अंतर्गत दोन गटात तुफान हाणामारी, युवक गंभीर
खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जेतवन नगरात जुन्या भांडणातून दोन गटांत हाणामारी झाली असून, धारदार शस्त्राने वार केल्याने युवक गंभीर जखमी झाला आहे. जुन्या भांडणातून दोन गटांत चांगलाच वाद झाला. वादाचे पर्यवसान जोरदार हाणामारीत झाले. यामधे दोन्ही गटांतील लोकं जखमी झाले असून त्यांना तात्कळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.
उसनवारीच्या पैशावरून हा वाद झाल्याचे सुत्रांकडून माहीती प्राप्त झाली आहे. या घटनेत दोन्ही गटातील ९ ते १० जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. १२ मे च्या रात्री याप्रकरणी परस्परांमधे वाद झाले होते. दिलेल्या तक्रारीवरून अनेक जणांच्या विरोधामध्ये खदान पोलीस स्टेशन येथे जिवघेणा हल्ला प्रकरणी विविध कलमान्वये आणि ऍट्रॉसिटी ऐक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत दोन्ही गटातले प्रत्येकी तीन-तीन लोकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या