बापरे! व्यावसायिकाचे अपहरण; शहरात खळबळ, अकोल्यातील नागरीक असुरक्षित!
अकोला रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रायली जीन परीसरात राहणारे अरुण वोरा या व्यावसायिकाचे मारुती व्हॅनमध्ये आलेल्या काही अज्ञात आरोपींनी अपहरण केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचुन तपास सुरु केला आहे. व्यावसायिक अरुण वोरा हे पाण्याची बॉटलचे मोठे व्यापारी मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाचे अपहरण करणारे आरोपी पांढऱ्या रंगाच्या 800 क्रमांकाच्या कारमधून प्रवास करत होते आणि जवळपास 3 तास घटनास्थळी व्यावसायिकाची वाट पाहत होते. संधी मिळताच त्यांनी व्यावसायिकाचे अपहरण केले असुन शहर उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली असून तपासाची दिशा वेगाने घेतली आहे. शहरात गुनहेगारीचे वृत्त पाहता अलंकार मार्केट मध्ये एका रात्रीत नऊ दुकानं फोडून चोरीची घटना झाली होती. तसेच काही दिवसापूर्वी एका उद्योगपतीच्या घरी चोरीची घटना घडली. तर आज व्यावसायिकाचे वर्दळीच्या रस्त्याहून अपहरण झाल्याची घटना घडली, यामुळे अकोल्यातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या