महामार्गावर अपघाता मधे कुरणखेड येथील दोन युवक जखमी
कुरणखेड - मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या महामार्ग ५३ वरील अनभोरा गावा जवळ आज दुपारी अपघात झाला या मधे दोन युवक जखमी झाले आहे
सध्या राष्ट्रीय राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे या महामार्गावरून वाहतूक आता ही सुसाट झाली आहे त्यामध्ये आता होणारे अपघात हे गंभीर अपघात होत आहे याच मध्ये आज दुपारी मुर्तीजापुर येथून आपल्या एम.एच.३० डि.ई.०५१७ या मालवाहतूक गाडीने आपल्या कुरणखेड गावी येत असताना कुरणखेड येथील हॉटेल व्यावसायिक संतोष श्रीराम सावरकर, तथा सहकारी सतीश बाजीराव कोथळकर, त्यांच्या गाडीचे टायर फुटल्यामुळे गाडीचे नियंत्रण गेल्यामुळे अंनभोरा जवळ महामार्गावर अपघात घडला या अपघातामध्ये चालक आणि वाहक हे जखमी झाले होते जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुर्तीजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते यावेळी गाडी मधील पाणी बॉटल थंड पेयजल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी नागरिकांनी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती
0 टिप्पण्या