विधवा महिलांना साडी- चौळी देऊन बिल्डींग पैंटर बांधकाम मजूर असो. चा मजूर मेळावा संपन्न
अकोला - १ में जागतिक कामगारदिना निमित्य बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असो. च्या वतीने असंघटीत मजूर मेळाव्याचे आयोजन आबासाहेब खेडकर सभागृह, अकोला येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष अनुराधाताई उद्धवराव ढिसाळे, उद्घाटक - कल्पनाताई शैलेश सूर्यवंशी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत भावनिकतेने कुटुंबाचा आधारवड गेल्यानंतर समर्थपने कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वीर विधवा मातांचा साडी- चोळी देऊन कार्यगौरव सन्मान करण्यात आला.
प्रमुख आतिथी म्हणून प्रदीप वखारिया , सहाय्यक आयुक्त उत्तर झोन मनपा, विठ्ठल देवकते ,सहा आयुक्त पूर्व झोनविजय परतवार, सहा. आयुक्त दक्षिण झोन देविदास निकाळजे , जेष्ठ कवी, व कलाकार वसंतदादा मानवतकर, उपस्थित होते. दिपप्रज्वलन नंतर परिवर्तनवादी विचारांच्या महामानवांना अभिवादन करून देश विकासाकरिता कष्ट करणाऱ्या असंघटीत मजूर माय-बाप यांचे पुष्पवर्षाव करून स्वागत केले. अतिथीचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष, शैलेश सूर्यवंशी यांनी केले. संघटनेच्या ३२ वर्षोच्या प्रवासाचा आढावा घेतला . विठृठलराव देवकते, सहा. आयुक्त यांनी असंघटीत मजूर संघटितपणे बिल्डींग पेंटर्स बांधकाम मजूर असो. च्या माध्यमातून संघर्ष करून आपले हक्क मिळवून घेतात त्याबद्दल अभिनंदन केले आणि मजुरांना कायदेशीर सहाय्य करण्यास सदैव तत्पर असल्याचे सांगितले. प्रकाश तेलगोटे यांनी सहपत्नी सर्व अतिथींचे विशाल पुष्पहारादूवारे स्वागत केले . सूत्रसंचालन पंचशील जी. गजघाटे जिल्हा सचिव यांनी केले. अध्यक्षा महिला अनुराधाताई ढिसाळे यांनी मार्गदर्शन करून सर्वाचे आभार मानले या प्रसंगी निष्टावन असंघटीत मजूर, भास्कर सोनोने,
संजय ठोसर, कुणाल नागदेवे, राजेश म्हैसकर, अनिल येलेकर, सतीश नागदेवे, निशिकांत सरदार, सागरर नितनवरे, उद्धवराव दिसाळे, रघुनाथ रायबोले, संजय राउत, अनिल वाघमारे, सचिन तायडे, सुनिताताई गजघाटे, देवकाबाई
शिरसाट, शारदा वानखडे, ज्योती डोंगरे, शारदा ओगले, आशा कोल्हे, सोनू् बुढनकर, रेखा गेडाम, शीला तरोने, कल्पना महल्ले, कांचन महाजन, करुणा कांबळे, योगिता इंगळे, कीत्ती खांडेकर, सविता पवार, सोनाली हेद, बहुसंख्य असंघटीत मजूर सहकार्यानी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सहकार्य केले.
0 टिप्पण्या