Ticker

6/recent/ticker-posts

मनसेच्या जनहित विभाग अकोला जिल्हा अध्यक्ष पदी पंजाबराव जगताप तर जिल्हाउपाध्यक्ष पदी अमोल पुंडकर यांची निवड

मनसेच्या जनहित विभाग अकोला जिल्हा अध्यक्ष पदी पंजाबराव जगताप तर जिल्हाउपाध्यक्ष पदी अमोल पुंडकर यांची निवड


अकोला
सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहचविण्यासाठी पक्षनेते राजूभाऊ उंबरकर,अँड किशोरजी शिंदे पक्ष सरचिटणीस तथा अध्यक्ष विधी व जनहित विभाग,मा विठ्ठल लोखंडकर संपर्क नेते श्री महेश जोशी सरचिटणीस विधी व जनहित विभाग यांच्या मार्गदर्शनात जनहितच्या राज्य उपाध्यक्ष प्रा संगीता चव्हाण यांच्या नेतृत्वात अँड नंदकिशोर शेळके विधी विभाग सरचिटणीस मनसे जिल्हा अध्यक्ष राजेश काळे, जिल्हा अध्यक्ष पंकज साबळे महिला सेना जिल्हा अध्यक्ष सौ प्रशंषा अंबेरे शहर अध्यक्ष सौरभ भगत, शहर संघटक अरविद शुक्ला जिल्हा उपाध्यक्ष शेखर पोटदुखे यांच्या उपस्थितीत अकोला जिल्ह्यातील पंजाबराव जगताप यांची जनहित विभाग जिल्हा अध्यक्ष अमोल पुंडकर जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघाडे यांची अकोला तालुका अध्यक्ष अविनाश देशमुख अकोला शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली यावेळी अकोला जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यापारी श्याम मोटवानी,निलेश संघवाई, विनायकराव घुगे,कुणाल धाडसे,मोहन कानपुरे,साहिल मानवानी, विजय मानवानी, वसंत जायदे,ओमप्रकाश मनवानी,भैरूमल अडवाणी,निखिल कुमार खुराणी,मनिष मोटवानी,चेतन शेरेकर,सुनील ढोले आदीचा पक्ष प्रवेश करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन अकोला येथील सुप्रसिद्ध हॉटेल वेलकम मध्ये पंजाबराव जगताप व त्यांच्या सहकाऱ्यानी केले.उपस्थितांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.



महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या